Goregaon Filmcity: शूटिंग सुरू असतानाच ‘या’ सेटवर घुसला बिबट्या, मराठी कलाकारांची तंतरली!

मुंबई तक

ADVERTISEMENT

leopard entered goregoan filmcity sets of marathi tv serial sukh mhanje nakki kay asta mumbai news in marathi
leopard entered goregoan filmcity sets of marathi tv serial sukh mhanje nakki kay asta mumbai news in marathi
social share
google news

News Marathi Latest: शिवशंकर तिवारी, मुंबई: एकीकडे मुंबईकरांना धडकी भरवणारा पाऊस कालपासून बरसत असताना दुसरीकडे काल (26 जुलै) छोट्या पडद्यावरील मराठी कलाकारांना (Marathi Actor) हादरवून टाकणारी घटना मुंबईतील गोरेगाव फिल्मसिटीमध्ये (Goregoan Filmcity) घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, स्टार प्रवाहवरील सुप्रसिद्ध मालिका ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ (Sukh Mhanje Nakki Kay Asta) मालिकेच्या सेटवर काल संध्याकाळी चार वाजेच्या सुमारास अचानक एक बिबट्या (Leopard) हा आपल्या बछड्यासह घुसला. ज्यावेळी हा बिबट्या सेटमध्ये घुसला त्यावेळी तिकडे कलाकारांसह एकूण 200 जण हजर होते. सुदैवाने बिबट्याने इथे कोणावरही हल्ला केला नाही. मात्र, या सगळ्या प्रकारामुळे सर्वांची भीतीने गाळण उडाली. (leopard entered goregoan filmcity sets of marathi tv serial sukh mhanje nakki kay asta mumbai news in marathi)

बिबट्या सेटवर आल्याने कर्मचाऱ्यांमध्ये एकच दहशत पसरली आणि अनेक जण सुरक्षित ठिकाण शोधण्यासाठी इकडे तिकडे पळू लागले. मागील दहा दिवसातील ही दुसरी ते तिसरी घटना आहे की, अचानक सेटवर बिबट्या घुसला आहे. यामुळे कलाकार आणि येथे काम करणाऱ्या शेकडो कर्मचाऱ्यांमध्ये आता भीतीचं वातावरण आहे.

हे ही वाचा >> पाच अफेअर्सनंतर सहाव्या गर्लफ्रेंडशी लग्न, कोण आहे ‘हा’ 57 वर्षीय अभिनेता?

गोरेगाव फिल्म सिटी हा संपूर्ण भाग जंगलसदृश्य आहे. इथे अनेक टेकड्या आणि मोठ्या प्रमाणत झाडंझुडपं आहेत. ज्यामुळे येथील परिसरात बिबट्या आणि काही श्वापदांचा वावर असतो. पण गेल्या काही महिन्यांपासून बिबटे हे थेट येथील सेटमध्ये घुसत आहे. अनेक सेटवर बिबट्याला रोखण्यासाठी तारांच्या सुरक्षा जाळ्या लावण्यात आल्या आहेत. मात्र, तरीही बिबटे सातत्याने सेटवर येत असल्याने येथील कर्मचारी आणि कलाकारांमध्ये बरीच भीती बसली आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

‘कर्मचारी, कलाकारांचा जीव गेल्यावर सरकारला जाग येणार का?’

दरम्यान, ऑल इंडियन सिने वर्कर्स असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश श्यामलाल गुप्ता यांनी याबाबत प्रतिक्रिया देताना सांगितलं की, ‘गोरेगाव फिल्म सिटीमध्ये ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मराठी मालिकेच्या सेटवर अचानक बिबट्या आपल्या बछड्यासह घुसला. सेटवर दोनशेहून अधिक लोकं होते. आज कोणाचा जीवही जाऊ शकला असता.. बिबट्याचं सेटवर येणं ही 10 दिवसांच्या आत ही तिसरी-चौथी घटना आहे.’

‘अनेक सेटवर बिबट्या दिसत आहेत. त्यानंतरही सरकार कोणतीही ठोस पावलं उचलताना दिसत नाहीए. हा मुद्दा मी विधानसभेपर्यंत पोहचवला. विधानसभेत हा मुद्दा आल्यानंतर देखील सरकार या महत्त्वपूर्ण मुद्द्याकडे अजिबात लक्ष देत नाहीए.’

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> Karan Johar निर्मात्यांवर संतापला, काय आहे ‘मेरी ख्रिसमस’शी कनेक्शन?

‘सरकार कोणाचा जीव जाण्याची वाट पाहत आहे का? आज संपूर्ण फिल्म सिटीमध्ये भीतीचं वातावरण आहे. अशा भीतीच्या वातावरणामुळे शूटिंग कमी होतील आणि तिथं लोकं येणं कमी करतील. यासाठीच मी महाराष्ट्र सरकारला आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्याकडे मागणी करतो की, यावर लवकरच ठोस असा निर्णय घ्यावा. हजारो कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा हा प्रश्न आहे आणि तो तुमच्याच हाती आहे.’

ADVERTISEMENT

‘जर कोणत्याही कामगाराचा किंवा कलाकाराचा जीव गेला तर त्याला जबाबदार फक्त आणि फक्त महाराष्ट्र सरकारच असेल.’

‘तसंच सरकारने जर याबाबत ठोस उपाययोजना केली नाही तर हजारो कर्मचारी आणि कलाकारांसह आम्हाला उपोषण करावं लागेल आणि फिल्मसिटीमधील सगळं काम हे बंद होईल.’ असा थेट इशाराच गुप्ता यांनी सरकारला दिला आहे.

 

    follow whatsapp

    ADVERTISEMENT