VIDEO : उद्या माझं लग्न होणार, महिमा चौधरीने स्वत: दिलं आमंत्रण; वयाच्या 52 व्या वर्षी दुसरा विवाह करणार?
Mahima Chaudhary Second Wedding : याच व्हिडिओमुळे चाहत्यांमध्ये आणि सोशल मीडियावर ती दुसरं लग्न करणार असल्याची चर्चा रंगली. अनेकांना वाटलं की महिमा आयुष्यात नवा अध्याय सुरू करणार आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
VIDEO : उद्या माझं लग्न होणार, महिमा चौधरीने स्वत: दिलं आमंत्रण
वयाच्या 52 व्या वर्षी दुसरा विवाह करणार?
बॉलिवूडमधील लोकप्रिय आणि मोहक अभिनेत्री म्हणून ओळख असलेली महिमा चौधरी गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. वयाच्या 52 व्या वर्षी ती पुन्हा लग्न करणार असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर सुरु आहेत. कारणही तसंच महिमाने स्वतः मीडियासमोर “उद्या माझं लग्न आहे, या माझ्या लग्नाला” असं हसत-खेळत आमंत्रण दिलं आणि सर्वांनाच अवाक् करून सोडलं.
अलिकडेच ती एका कार्यक्रमात पोहोचली असताना पॅपराझींनी तिला फोटोसाठी थांबवले. तेवढ्यात महिमाने हलक्याफुलक्या अंदाजात, “कल मेरी शादी होने वाली है… आप सब आना” असं म्हणत पुढे चालत गेली. हे संपूर्ण संभाषण कॅमेरात कैद झालं आणि काही सेकंदांत इंटरनेटवर व्हायरलही झालं. 90 चं दशक गाजवणारी, चेहऱ्यावर सदैव तेज असलेली ही अभिनेत्री दुसरं लग्न करतेय का, असा प्रश्न अनेकांना पडला.
खरोखरच महिमा चौधरी दुसरं लग्न करतेय का?
याच व्हिडिओमुळे चाहत्यांमध्ये आणि सोशल मीडियावर ती दुसरं लग्न करणार असल्याची चर्चा रंगली. अनेकांना वाटलं की महिमा आयुष्यात नवा अध्याय सुरू करणार आहे. मात्र, या चर्चेमागचं सत्य वेगळंच आहे. महिमा चौधरी प्रत्यक्षात लग्न करत नाहीये, तर तिच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी ती हा गमतीदार प्रयोग करत आहे.
‘दुर्लभ प्रसाद की दूसरी शादी’ या तिच्या नव्या चित्रपटाला प्रमोट करण्यासाठी ती मुद्दाम लग्नाचा उल्लेख करतेय. या सिनेमात ती अनुभवी कलाकार संजय मिश्रा आणि व्योम यादव यांच्यासोबत प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. प्रमोशनच्या निमित्ताने महिमाने काही कार्यक्रमांमध्ये लाल जोडा घालून हजेरीही लावली होती, ज्यामुळे या चर्चांना आणखी उधाण आलंय.










