अभिनेत्री श्रद्धा कपूरचा भाऊ सिद्धांतला पोलिसांनी घेतलं ताब्यात; प्रकरण नेमकं काय?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

अभिनेत्री श्रद्धा कपूरचा भाऊ सिद्धांत कपूरला बंगळुरू पोलिसांनी अटक केली आहे. बंगळुरू पोलिसांनी हॉटेलवर धाड टाकली होती, त्यानंतर सिद्धांत कपूरला ताब्यात घेण्यात आलं. त्याच्यावर ड्रग्ज सेवन केल्याचा आरोप आहे.

ADVERTISEMENT

अभिनेता सुशांत प्रकरणापासून ते आर्य खानपर्यंत अनेक सेलिब्रेटींची नावं ड्रग्ज प्रकरणात आल्यानंतर आता अभिनेत शक्ती कपूर यांचा मुलगा सिद्धांत कपूर याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

लता मंगेशकरांचं ‘श्रद्धा कपूर’शी आहे खास नातं; पहा कुटुंबासोबतचे दुर्मिळ फोटो

हे वाचलं का?

बंगळुरू पोलिसांनी शहरातील एमजी रोडवर असलेल्या एका हॉटेलवर धाड टाकली. पोलिसांनी हॉटेलवर धाड टाकली त्यावेळी सिद्धांत कपूरसह काही जणांना ताब्यात घेण्यात आलं. मिळालेल्या माहितीनुसार हॉटेलमध्ये असलेल्यांची चाचणी करण्यात आली.

सिद्धांत कपूरसह एकूण सहा जणांच्या चाचण्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. म्हणजेच त्यांनी ड्रग्जचं सेवन केल्याचं आढळून आलं आहे.

ADVERTISEMENT

सिद्धांत कपूर प्रसिद्ध अभिनेते शक्ती कपूर यांचा मुलगा आहे. सिद्धांत कपूर स्वतःही सिनेसृष्टीशी जोडलेला आहे. सिद्धांत कपूरने अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. मात्र, सिद्धांत कपूरचं करिअर फ्लॉप राहिलं आहे.

ADVERTISEMENT

चित्रपटांबरोबरच सिद्धांत कपूरने वेब सीरिज आणि म्युझिक व्हिडीओमध्येही काम केलेलं आहे. अनेक भूमिका करूनही सिद्धांत स्वतःची ओळख निर्माण करू शकलेला नाही. सिद्धांतने बहीण श्रद्धा कपूरसोबत हसीना पारकर सिनेमामध्येही भूमिका केलेली आहे.

ड्रग्ज प्रकरणात श्रद्धा कपूरचंही आलं होतं नाव

आतापर्यंत बॉलिवूडमधील अनेक कलाकारांची नावं ड्रग्ज प्रकरणात समोर आलेली आहेत. या कलाकारांना एनसीबीकडून चौकशीसाठीही बोलवलं गेलं होतं. यात सिद्धांत कपूरची बहीण अभिनेत्री श्रद्धा कपूरचंही नाव आलं होतं.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यूनंतर समोर आलेल्या ड्रग्ज प्रकरणात श्रद्धा कपूर एनसीबी अर्थात अंमली पदार्थ नियंत्रण विभागाच्या रडारवर आली होती. याच प्रकरणात एनसीबीने श्रद्धा कपूरची चौकशीही केली होती. श्रद्धा कपूर आणि सुशांत सिंह राजपूतने छिछोरे चित्रपटात सोबत काम केलं होतं.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT