सुश्मिता सेन आणि ललित मोदींचं ब्रेकअप झालं? समोर आलं हे कारण

मुंबई तक

ललित मोदी आणि सुश्मिता सेन यांच्या लव्हस्टोरीचा शेवट झाल्याची चर्चा आहे. ललित मोदींच्या इंस्टाग्रामवर पाहिल्यास तसे संकेत मिळत आहेत. या जोडप्याच्या नात्याची घोषणा एका महिन्यापूर्वीच झाली होती. आणि आता त्यांचे नाते तुटल्याच्या बातम्या येऊ लागल्या आहेत. त्यांच्या विभक्त होण्याचे कारण सुश्मिताचा एक्स बॉयफ्रेंड रोहमन शॉल असल्याचे सांगितले जात आहे. ललित-सुश्मिताचं ब्रेकअप झालंय का? सुश्मिता सेन […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

ललित मोदी आणि सुश्मिता सेन यांच्या लव्हस्टोरीचा शेवट झाल्याची चर्चा आहे. ललित मोदींच्या इंस्टाग्रामवर पाहिल्यास तसे संकेत मिळत आहेत. या जोडप्याच्या नात्याची घोषणा एका महिन्यापूर्वीच झाली होती. आणि आता त्यांचे नाते तुटल्याच्या बातम्या येऊ लागल्या आहेत. त्यांच्या विभक्त होण्याचे कारण सुश्मिताचा एक्स बॉयफ्रेंड रोहमन शॉल असल्याचे सांगितले जात आहे.

ललित-सुश्मिताचं ब्रेकअप झालंय का?

सुश्मिता सेन आणि ललित मोदी यांनी अद्याप ब्रेकअपबद्दल काहीही सांगितलेलं नाही. दोघांनीही याबाबत कोणतीही पोस्ट शेअर केलेली नाही. पण सोशल मीडिया यूजर्सनी ललित मोदींच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर काही मोठे बदल पाहून दोघे एकत्र नसल्याचा निष्कर्ष काढला आहे. ललित मोदींनी तिच्या इंस्टाग्राम प्रोफाईलवरून फक्त सुश्मिताचे नावच काढले नाही तर तिच्यासोबतचा फोटोही हटवला आहे.

प्रोफाइलवरून सुश्मिताचा फोटो आणि नावही काढलं

हे वाचलं का?

    follow whatsapp