Otzi the Iceman : 5000 वर्ष जुन्या ममीचा इतिहास, एक्स-रे मधून समजलं तरी काय?
पाच हजार वर्षांपूर्वी असाच एक व्यक्ती होता ज्याचं नाव ओत्झी होतं. ओत्झी- प्रत्यक्षात एक ममी आहे. पण ममीचे संपूर्ण शरीर जवळजवळ शाबूत आहे. त्याला त्वचा आणि नसाही आहेत.
ADVERTISEMENT

आजपासून पाच हजार वर्षांपूर्वी माणूस कसा राहत होता? उदर्निवाहासाठी काय करत होता? तो धातूंचा वापर करायला कसा शिकला? या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न इतिहासकार आणि पुरातत्वशास्त्रज्ञ दीर्घकाळापासून करत आहेत. पाच हजार वर्षांपूर्वी असाच एक व्यक्ती होता ज्याचं नाव ओत्झी होतं. ओत्झी- प्रत्यक्षात एक ममी आहे. पण ममीचे संपूर्ण शरीर जवळजवळ शाबूत आहे. त्याला त्वचा आणि नसाही आहेत. (5000 years Ago history of Otzi the Iceman revealed through X-rays)
यासोबतच हृदय, मूत्रपिंड, यकृत सर्व अवयव ठीक आहेत. एवढंच नाही तर, ओत्झीचे कपडेही शाबूत आहेत. तसंच त्याच्याकडचे अवजार, शस्त्रही मिळाले आहेत. यासह ओत्झीच्या शरीरावर किती आणि कोणत्या प्रकारचे टॅटू आहेत. 5 हजार वर्षांपूर्वी टॅटू का काढत होते? याचाही शोध घेण्यात आला आहे.
नव्या संसदेचा आजपासून श्रीगणेशा, जाणून घ्या ‘या’ भवनाची 5 वैशिष्ट्ये
पाच हजार वर्षांपूर्वीची ओत्झीची कहाणी?
ओत्झीची कहाणी पाच हजार वर्षांपूर्वीची आहे. पण ती उलघडली, 19 सप्टेंबर 1991 रोजी. जेव्हा दोन जर्मन गिर्यारोहक ऑस्ट्रिया आणि इटलीमधील आल्प्स पर्वतरांगांमध्ये भटकत होते. तेव्हा अचानक त्यांना उंचावर एक मृतदेह दिसला. मृतदेहाचे डोके आणि खांदे बाहेर दिसत होते तर बाकीचं शरीर बर्फात गाडलं गेलं होतं. हे पाहून त्या दोन गिर्यारोहकांनी मृतदेहाची माहिती अधिकाऱ्यांना दिली. मृतदेहाची वैद्यकीय चाचणी करण्यात आली. मृत्यूचे कारण शोधण्यासाठी चाचणी करण्यात आली. पण एक विचित्र गोष्ट समोर आली. हा मृतदेह काही सामान्य नव्हता. ही व्यक्ती 5 हजार वर्षांपूर्वी मरण पावली होती.