Govt Job: अरे व्वा! चक्क BIS मध्ये होतेय भरती, कोणाला करता येणार अर्ज?

रोहिणी ठोंबरे

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

भारतीय मानक ब्यूरोमध्ये सध्या भरती होत आहे.

point

पात्र आणि इच्छुक उमेदवार, 30 सप्टेंबर 2024 पर्यंत अर्ज करू शकतात.

point

परीक्षेबाबची माहिती नंतर कळविण्यात येईल.

BIS Recruitment 2024 : भारतीय मानक ब्यूरोमध्ये सध्या भरती होत आहे. असिस्टंट डायरेक्टर (Administration & Finance), असिस्टंट डायरेक्टर (Marketing & Consumer Affairs), असिस्टंट डायरेक्टर (Hindi), पर्सनल असिस्टंट, असिस्टंट सेक्शन ऑफिसर, असिस्टंट (Computer Aided Design), स्टेनोग्राफर, सिनियर सेक्रेटरियल असिस्टंट, ज्युनियर सेक्रेटरियल असिस्टंट, टेक्निकल असिस्टंट (Laboratory), सिनियर टेक्निशियन, टेक्निशियन (Electrician/Wireman) अशा एकूण 12 पदांसाठी 345 जागांवर नोकरीची संधी आहे.

ADVERTISEMENT

पात्र आणि इच्छुक उमेदवार, 30 सप्टेंबर 2024 पर्यंत अर्ज करू शकतात. परीक्षेबाबची माहिती नंतर कळविण्यात येईल. नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत आहे. (Govt Job opportunity 2024 recruitment in BIS Bureau of Indian Standards who can apply)

हेही वाचा : Ladki Bahin Yojana: माझी लाडकी बहीण योजनेत मोठा बदल! आता फक्त...

शैक्षणिक पात्रता

अर्ज करणाऱ्या उमेदवारांची शैक्षणिक पात्रता, 

हे वाचलं का?

  • पद क्र.1- 1) CA/CWA/MBA (Finance) 2) 03 वर्षे अनुभव
  • पद क्र.2- 1) MBA (Marketing) किंवा मास कम्युनिकेशनमधील पदव्युत्तर पदवी/PG डिप्लोमा किंवा सामाजिक कार्यात पदव्युत्तर पदवी/PG डिप्लोमा 2) 05 वर्षे अनुभव
  • पद क्र.3- 1) हिंदी/इंग्रजी पदव्युत्तर पदवी 2) 05 वर्षे अनुभव
  • पद क्र.4- 1) पदवीधर 2) शॉर्टहँड चाचणी: डिक्टेशन: 7 मिनिटे @100 श.प्र.मि., लिप्यंतरण: संगणकावर 45 मिनिटे (इंग्रजी), 60 मिनिटे (हिंदी)
  • पद क्र.5- 1) पदवीधर 2) संगणक प्रवीणता चाचणी: Level-6 3) संगणक प्रवीणतेमध्ये पात्रता कौशल्य चाचणी
  • पद क्र.6-  BSc + Auto CAD मध्ये 05 वर्षे अनुभव किंवा इंजिनीअरिंग डिप्लोमा (Civil/ Mechanical/ Electrical)+Auto CAD आणि ड्राफ्ट्समनशिप मध्ये 05 वर्षे अनुभव
  • पद क्र.7- 1) पदवीधर 2) संगणक प्रवीणता चाचणी: Level-5 3) शॉर्टहँड चाचणी: हिंदी/इंग्रजी 80 श.प्र.मि.
  • पद क्र.8- 1) पदवीधर 2) संगणक प्रवीणतेची पात्रता कौशल्य चाचणी यामध्ये खालील गोष्टींचा समावेश आहे: (a) वर्ड प्रोसेसिंग टेस्ट – पंधरा मिनिटांत 2000 की डिप्रेशन्स; (b) मायक्रोसॉफ्ट एक्सेलवरील स्प्रेड शीटमध्ये चाचणी – पंधरा मिनिटे; आणि (c) पॉवर पॉइंट (मायक्रोसॉफ्ट पॉवरपॉइंट) मधील चाचणी – पंधरा मिनिटे
  • पद क्र.9- 1) पदवीधर 2) संगणक प्रवीणता चाचणी: उमेदवार राष्ट्रीय कौशल्य पात्रता फ्रेमवर्कच्या किमान स्तर 5 पर्यंत निपुण असावा. चाचणी पात्रता स्वरूपाची असावी; 3) टायपिंग स्पीड टेस्ट: संगणकावर इंग्रजीमध्ये 35 श.प्र. मि. प्रति मिनिट किंवा हिंदीमध्ये 30 श.प्र. मि. प्रत्येक शब्दासाठी 5 की डिप्रेशन  (वेळ अनुमत – दहा मिनिटे)
  • पद क्र.10- 60% गुणांसह मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा 60% गुणांसह B.Sc (Chemistry/Microbiology) [SC/ST: 50% गुण]
  • पद क्र.11- 1) 10वी उत्तीर्ण 2) ITI (Electrician/ Fitter/ Carpenter/ Plumber/ Wireman/Welder) 3) 02 वर्षे अनुभव
  • पद क्र.12- 1) 10वी उत्तीर्ण 2) ITI  (Electrician/Wireman) असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय, 

  • पद क्र.1 ते 3- 18 ते 35 वर्षे
  • पद क्र.4 ते 6 आणि 10- 18 ते 30 वर्षे
  • पद क्र.7, 8, 9, 11 , 12- 18 ते 27 वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.

हेही वाचा : Crime : मैत्रिणीनेच केला घात! गुंगीचे औषध देऊन मित्रांकडून बलात्कार, बदलापूर पुन्हा हादरलं

शुल्क

  • पद क्र.1 ते 3- जनरल/ ओबीसी कॅटेगरीतील उमेदवारांकडून 800 रूपये शुल्क आकारले जात आहे.
  • पद क्र.4 ते 12- जनरल/ ओबीसी कॅटेगरीतील उमेदवारांकडून 500 रूपये शुल्क आकारले जात आहे.
  • तर, एससी/ एसटी/ पीडब्ल्यूडी/ महिला कॅटेगरीतील उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जात नाही आहे.

अधिक माहितीसाठी भारतीय मानक ब्यूरोच्या अधिकृत वेबसाइट https://www.bis.gov.in/ वरून माहिती मिळवू शकता.

ADVERTISEMENT

अर्जाची लिंक

https://ibpsonline.ibps.in/bisjan24/

ADVERTISEMENT

अधिकृत जाहिरात

https://drive.google.com/file/d/1osG_6orlsBE9GhTfcpHE7oh5np10118X/view?usp=sharing

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT