IAS Officer बनण्यासाठी तयारी करताय? काय आहे शैक्षणिक पात्रता?

रोहिणी ठोंबरे

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

How to become an IAS officer : भारतीय प्रशासकीय सेवा (IAS) ही भारतातील एक महत्त्वाची नागरी सेवा आहे ज्याचा मुख्य उद्देश सरकारी धोरणे अंमलात आणणे आणि देशाच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावणे आहे. हे अशा लोकांची निवड करते ज्यांच्याकडे सरकारी धोरणे राबविण्याची आणि प्रशासकीय कामे करण्याची क्षमता आहे. यासाठी काही स्टेप्स आहेत ज्यांचे पालन करून IAS होण्याचं तुमचं स्वप्न पूर्ण करू शकता.

आयएएस होण्यासाठी काही पात्रता निकष पूर्ण करणे आवश्यक आहे. यामध्ये वयोमर्यादा, शिक्षण आणि नागरिकत्व यानुसार निश्चित केलेल्या निकषांचा समावेश आहे. साधारणपणे, कमाल वयोमर्यादा 32 वर्षांपर्यंत असते. आयएएस अधिकाऱ्यांचे मुख्य कार्यक्षेत्र हे राज्य शासन आणि केंद्र सरकारच्या धोरणांचे प्रशासकीय काम आहे. 

IAS अधिकारी होण्यासाठी पात्रता आणि महत्त्वाच्या अटी

  • नागरिकत्व- उमेदवार भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे.
  • शिक्षण- उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठातून बॅचलर पदवी किंवा त्याच्या समकक्ष पदवी असणे आवश्यक आहे.
  • वयोमर्यादा- IAS परीक्षा देण्यासाठी उमेदवाराचे वय 21 ते 32 वर्षे दरम्यान असावे. सर्वसाधारण श्रेणीसाठी 32 वर्षे आणि अनुसूचित जाती/जमातीच्या उमेदवारांसाठी 37 वर्षे वयोमर्यादा आहे. 
  • परीक्षा पास करणं आवश्यक आहे- IAS होण्यासाठी, यशस्वी उमेदवारांना केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) द्वारे आयोजित नागरी सेवा परीक्षेत रँक मिळणं आवश्यक आहे.
  • नंबर ऑफ अटेम्प्ट्स- सामान्य श्रेणीतील उमेदवारांना 6 प्रयत्नांपर्यंत परवानगी आहे, तर SC/ST उमेदवारांना  कोमतीही मर्यादा नाही आहे. 

UPSC परीक्षेत उत्तीर्ण होणं आवश्यक!

आयएएस अधिकारी होण्यासाठी केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) द्वारे घेतलेली नागरी सेवा परीक्षा यशस्वीपणे उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. ही परीक्षा दरवर्षी घेतली जाते आणि त्यात प्राथमिक परीक्षा, मेन्स आणि इंटरव्ह्यू असतो.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT