Dussehra 2024 : कधीच येणार नाही पैशांचं टेन्शन! दसऱ्याला सुधारा 'या' 5 आर्थिक चुका

ADVERTISEMENT

 Kill Financial Demon In Dassera
Improve Your Bad Financial Habbits
social share
google news

बातम्या हायलाइट

point

दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर या वाईट सवयी सोडा, आर्थिक भरभराट होईल

point

'या' आर्थिक चुका करणं आताच टाळा, नाहीतर...

point

...तर तुम्हाला मिळेल पैसाच पैसा?

Vijaya Dashmi 2024 : आश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील दशमी तिथीला दसऱ्याचा मुहूर्त मानला जातो. या दिवशी वाईट गोष्टींचं दहन करून चांगल्या गोष्टींची सुरुवात केली जाते. याचदिवशी श्री रामाने रावणाचं दहन केलं होतं. दहा मुखी रावणाचं दहन केल्यानं या दिवसाला दशहरा (दसरा) म्हणतात. यावर्षी दसरा 12 ऑक्टोबरला शनिवारी साजरा केला जाईल. या शुभ मुहूर्तावर आम्ही तुम्हाला दहा आर्थिक चुकांबाबत (Financial Mistake) सांगणार आहोत, ज्या अनेक लोक नकळत करत असतात. ज्यामुळे भविष्यात मोठ्या नुकसानाला सामोरं जावं लागतं. या दसऱ्याला तुम्ही या चुका सुधारून नवीन संकल्प करू शकता. जर तुम्ही असं केलं, तर तुम्हाला येणाऱ्या काळात आर्थिक संकटांचा सामना करावा लागणार नाही.

ADVERTISEMENT

पैशांची बचत न करणे

काही लोक कितीही पैसे कमवले, तरीही पैशांची बचत करत नाहीत. पण भविष्याला सुरक्षीत ठेवण्यासाठी तुम्हाला पैशांची बचत करणं आवश्यक आहे. आपल्या पहिल्या कमाईतूनच पैशांची बचत केली पाहिजे. बचत करण्यासाठी 50:30:20 चा आर्थिक नियम फॉलो करा. प्रत्येकाने कमीत कमी 20 टक्क्यांची बचत नक्कीच केली पाहिजे. आज दसऱ्याच्या दिवशी बचन न करण्याच्या सवयीला बंद करा.

गुंतवणूक न करणे

पैशांची बचत करणं हेच महत्त्वाचं नसतं. आचार्य चाणक्यांनी म्हटलं आहे की, बचत केलेल्या पैशांची गुंतवणूक केली नाही, तर ते पैसे दिर्घकाळ टीकत नाहीत. पैशांना वाचवून त्यांची गुंतवणूक केली पाहिजे. गुंतवणूक केलेले पैसेच तुमच्या संपत्तीत वाढ करून देतात. तुम्ही भरपूर पैसै कमवत असाल, पण त्यांची गुंतवणूक करत नसाल, तर तुम्हाला समस्यांचा सामना करावा लागू शकतो. तुम्ही गुंतवणूक केली नसेल, तर दसऱ्याच्या मुहूर्तावर तुम्ही गुंतवणूक करू शकता.

हे वाचलं का?

हे ही वाचा >> Gold Rate Today : आजच खरेदी करा सोनं! नवरात्रीत किमती घसरल्या, मुंबईसह 'या' प्रमुख शहरांमध्ये भाव काय?

बजेट न बनवणे

अनेक लोक विचार न करता पैसे खर्च करतात. महिन्याचं बजेट बनवत नाहीत. परंतु, पैशांची बचत करायची असेल, तर बजेट बनवणं खूप महत्त्वाचं आहे. त्यानंतर तुम्ही खर्चावर नियंत्रण मिळवू शकता. कुठे किती रुपये खर्च करायचे आहेत, हे तुम्हाला माहित असेल.

उत्पन्नापेक्ष जास्त खर्च करणे

अंथरुण बघून पाय पसरावे, अशी म्हण आहे. पण काही लोकांना हे कळत नाही. म्हणजेच तुम्ही उत्पन्नापेक्षा जास्त पैसे खर्च करण्याच्या सवयीला थांबवले नाही, तर तुम्हाला भविष्यात आर्थिक संकंटांचा सामना करावा लागू शकतो. म्हणून आजच तुम्ही ही सवय सोडा.

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> Bhanudas Murkute: महिलेवर अत्याचार करणाऱ्या माजी आमदारचा 'तो' फोटो का होतोय Viral.. काय आहे कहाणी?

माहिती नसतानाही गुंतवणूक करणे

गुंतवणूक करणे चांगली गोष्ट आहे. परंतु, एखाद्या व्यक्तीचा सल्ला ऐकून तुम्ही पैसै गुंतवले तर नुकसानही होऊ शकतो. म्हणून जिथेही तुम्हाला गुंतवणूक करायची असेल, तेथील संपूर्ण माहिती घ्या. तुम्हाला गुंतवणूक केल्यावर किती फायदा होणार आहे, याचा अभ्यास करून पैशांची गुंतवणूक करा. 

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT