Govt Job: तुम्हीपण आहात इंजिनीअर? मग; 'NTPC'मध्ये नोकरीसाठी आजच करा अर्ज
NTPC Recruitment 2024 : इंजिनीअर असणाऱ्यांसाठी नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, 05 ऑगस्ट 2024 पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात. यासाठीची परीक्षा 21 जानेवारी 2025 रोजी होईल.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
इंजिनीअर असणाऱ्यांसाठी नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये नोकरीची संधी आहे.
पात्र आणि इच्छुक उमेदवार, 05 ऑगस्ट 2024 पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात.
यासाठीची परीक्षा 21 जानेवारी 2025 रोजी होईल.
NTPC Job Vacancy 2024 : इंजिनीअर असणाऱ्यांसाठी नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये (NTPC) नोकरीची संधी आहे. माइनिंग ओव्हरमन पदासाठी 67 जागा, मॅगझिन इन्चार्ज पदासाठी 09 जागा, मेकॅनिकल सुपरवाइजर पदासाठी 28 जागा, इलेक्ट्रिकल सुपरवाइजर 26 जागा, व्होकेशनल ट्रेनिंग इंस्ट्रक्टर पदासाठी 08 जागा, ज्युनियर माईन सर्व्हेअर पदासाठी 03 जागा आणि माइनिंग सरदार या पदासाठी 3 जागा आहेत. अशा एकूण 7 पदांवर 144 जागांसाठी भरती होत आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, 05 ऑगस्ट 2024 पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात. यासाठीची परीक्षा 21 जानेवारी 2025 रोजी होईल. नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत आहे. (job vacancy news are you also an engineer then apply now for NTPC recruitment 2024)
ADVERTISEMENT
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणारे उमेदवारांची शैक्षणिक पात्रता,
- पद क्र.1- 1) माइनिंग इंजिनीअरिंग डिप्लोमा 2) ओव्हरमन प्रमाणपत्र 3) प्रथमोपचार प्रमाणपत्र
- पद क्र.2- 1) माइनिंग इंजिनीअरिंग डिप्लोमा 2) ओव्हरमन प्रमाणपत्र 3) प्रथमोपचार प्रमाणपत्र
- पद क्र.3- इंजिनीअरिंग डिप्लोमा (Mechanical/Production)
- पद क्र.4- 1) इंजिनीअरिंग डिप्लोमा (Electrical/ Electrical & Electronics) 2) इलेक्ट्रिकल सुपरवाइजर प्रमाणपत्र
- पद क्र.5- 1) इंजिनीअरिंग डिप्लोमा (Mining/Electrical/Mechanical) 2) ओव्हरमन/फोरमन प्रमाणपत्र 3) प्रथमोपचार प्रमाणपत्र 4) 05 वर्षे प्रमाणपत्र
- पद क्र.6- 1) इंजिनीअरिंग डिप्लोमा (Mine Survey/Mining Engineering/ Mining & Mine Surveying/Civil) 2) सर्व्हे प्रमाणपत्र
- पद क्र.7- 1) 10वी उत्तीर्ण 2) माइनिंग सरदार प्रमाणपत्र 3) प्रथमोपचार प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
हेही वाचा : SC-ST आरक्षणाबाबत सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय, सगळी गणितं बदलणार!
वयोमर्यादा
- पद क्र.1 ते 4 आणि 6, 7 साठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 30 वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.
- पद क्र.5 साठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 40 वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.
हेही वाचा : Mazi Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेबाबत मुख्यमंत्री शिंदेंची प्रचंड मोठी घोषणा, व्हिडीओच केला शेअर!
शुल्क
- या पदांसाठी अर्ज करणाऱ्या जनरल/ ओबीसी/ इडब्ल्यूएस कॅटेगरीतील उमेदवारांकडून 300 रूपये शुल्क आकारले जात आहे.
- तर एससी/ एसटी/ पीडब्ल्यूडी/ इएक्सएसएम/ महिला कॅटेगरीतील उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
अधिक माहितीसाठी नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशनच्या अधिकृत वेबसाइटला https://ntpc.co.in/ भेट देऊ शकता.
हे वाचलं का?
हेही वाचा : पंढरीच्या वारीत घडला चमत्कार! दिंडीत चुकला पण... 250 किमी प्रवास करत घरी पोहचला श्वान!
अर्जाची लिंक
https://jobapply.in/nml2024/
अधिकृत जाहिरात
https://drive.google.com/file/d/1SMYJ3MrRzyNhq0-0ASaJYJNFnz-bhYTs/view?usp=sharing
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT