SC-ST आरक्षणाबाबत सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय, सगळी गणितं बदलणार!
सर्वोच्च न्यायालयाच्या सात न्यायाधीशांच्या खंडपीठाने म्हटले आहे की, राज्य सरकार अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींमध्ये उप-श्रेणी तयार करू शकते, जेणेकरून मूळ आणि गरजू प्रवर्गांना आरक्षणाचे अधिक लाभ मिळतील.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

SC-ST आरक्षणाबाबत सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय

सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे आरक्षणाची गणितं बदलणार

सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा नेमका कसा होणार फायदा?
नवी दिल्ली: सुप्रीम कोर्टाने अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या आरक्षणाबाबत एक अत्यंत मोठा आणि ऐतिहासिक असा निर्णय दिला आहे. कोर्टाने स्पष्ट केले आहे की, कोट्यातील कोटा हा तर्कसंगत फरकावर आधारित असेल. याबाबत राज्ये त्यांच्या मनानुसार काम करू शकत नाहीत. यासोबतच 2004 मध्ये ईव्ही चिन्नय्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायाधीशांनी दिलेला निर्णयही पलटला आहे. सध्याच्या खंडपीठाने 2004 मध्ये दिलेला निर्णय आता रद्दबातल ठरवला आहे. 2004 च्या निर्णयात सर्वोच्च न्यायालयच्या पाच न्यायधीशांच्या खंडपीठाने दिलेल्या निर्णयात म्हटले होते की अनुसूचित जाती (SC) आणि अनुसूचित जमातींमध्ये (ST) उप-श्रेणी तयार करता येणार नाहीत.
मात्र आता हाच निर्णय बदलत कोर्टाने SC आणि ST आरक्षणामध्ये उपश्रेणी बनवता येईल असा निर्णय दिला आहे. पण कोर्टाच्या याच निर्णयाने आरक्षणासंदर्भात आता राज्यासह देशातील गणितंही बदलतील.
कोर्ट म्हणाले की, 'आरक्षण असूनही खालच्या वर्गातील लोकांना त्यांचा व्यवसाय सोडणे कठीण जाते.' न्यायमूर्ती भूषण आर गवई यांनी सामाजिक लोकशाहीची गरज या विषयावर बाबासाहेब आंबेडकर यांच्या भाषणाचा हवाला देत म्हटले की, 'मागासवर्गीयांना प्राधान्य देणे हे राज्याचे कर्तव्य आहे, अनुसूचित जाती/जमाती प्रवर्गातील काही लोकच आरक्षणाचा लाभ घेत आहेत. परंतु अनुसूचित जाती/जमातीमध्ये अशा अनेक श्रेणीतील लोकं आहेत की, ज्यांना अनेक शतके अत्याचार सहन करावा लागत आहेत आणि हे सत्य नाकारता येणार नाही.'
हे ही वाचा>> Maratha Reservation : "मराठा आरक्षणाचे खरे कट्टर विरोधक उद्धव ठाकरेच"
न्यायमूर्ती गवई म्हणाले की, उपश्रेणीचा आधार हा आहे की मोठ्या गटातून एका गटाला अधिक भेदभावाला सामोरे जावे लागते. त्यांनी आंबेडकरांचे एक विधान वाचून दाखवले की, 'इतिहास दाखवतो की जेव्हा नैतिकतेला अर्थव्यवस्थेचा सामना करावा लागतो तेव्हा अर्थव्यवस्था जिंकते.'