Maratha Reservation History : पहिल्यांदा कधी झाली होती मागणी? असा आहे इतिहास
Maratha Reservation Demand : मराठा आरक्षणाची पहिली मागणी कधी झाली होती? मराठा आरक्षण कायदा कसा अस्तित्वात आला आणि सुप्रीम कोर्टाने मराठा समाजाला आरक्षण का नाकारलं?
ADVERTISEMENT

Maratha Reservation Demand : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक भागात हिंसाचार उसळला आहे. हा मुद्दा प्रदीर्घ काळापासून कायदेशीर प्रक्रियेत अडकून पडला आहे. सर्वोच्च न्यायालयाने 2021 मध्ये मराठा आरक्षण घटनाबाह्य ठरवलं. त्यानंतर राज्य सरकारकडून क्युरेटिव्ह पिटिशन दाखल करण्यात आली. त्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाने होकार दिला आहे. पण, मराठा आरक्षणाची पहिल्यांदा मागणी कधी झाली? मराठा आरक्षण कायदा कसा अस्तिस्त्वात आला होता, हेच जाणून घ्या.
मराठा आरक्षणाची पहिली मागणी 1997 मध्ये करण्यात आली. मराठा समाजासाठी स्वतंत्र आरक्षण दिले जावे, अशी मागणी त्यावेळी करण्यात आली. बरीच वर्ष ही मागणी होत राहिली. पुढे जुलै 2008 मध्ये राज्य सरकारने निवृत्त न्यायाधीश आर.एम.बापट यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली होती. त्यांनी आपला अहवाल दिला. या समितीने मराठा आरक्षण पाठिंबा दिला नाही.
राणे समिती आणि मराठा आरक्षण
सहा वर्षांनंतर म्हणजे 2014 मध्ये आताचे भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या नेतृत्वाखालील समितीने सरकारला अहवाल सादर केला की, राज्यातील 32% लोकसंख्या मराठा आहे, ज्यांना आर्थिक विकासाची गरज आहे. त्यांना आरक्षण दिले पाहिजे, असे या समितीने सांगितले.
हे ही वाचा >> ‘साहेब याचे परिणाम बघा कसे भोगायला लागतील..’, जरांगे-पाटलांचा कोणाला थेट इशारा?
पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील सरकारने मराठा समाजासाठी सरकारी नोकऱ्या आणि शैक्षणिक संस्थांमध्ये 16 टक्के आणि मुस्लिमांसाठी 5 टक्के जागा राखीव ठेवण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. ताबडतोब एक अध्यादेश काढण्यात आला, पण त्याला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आणि 2014 मध्ये अंमलबजावणीला स्थगिती दिली.