Period At early Age : मुलींना ‘या’ वयाआधी मासिक पाळी येणे आरोग्यासाठी धोकादायक, कारण…

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

menstruation before this age is dangerous for health type 2 diabetics risk health tips
menstruation before this age is dangerous for health type 2 diabetics risk health tips
social share
google news

Menstruation at an Early Age : मुलींना वयाच्या 11 ते 15 वर्ष वयोगटात मासिक पाळी येण्यास सुरुवात होते. पण नुकताच एक रिसर्च समोर आला आहे. या रिसर्चमध्ये ज्या मुलींना कमी वयात मासिक पाळी येतात, त्यांना पुढे जाऊन गंभीर आजारांचा सामना करावा लागतो. हे आजार काही साधेसुधे नाही आहेत, तर गंभीर स्वरूपाचे आहेत. त्यामुळे लवकर मासिक पाळी येण्याचा आरोग्याला काय धोका असतो, हे जाणून घेऊयात. (menstruation before this age is dangerous for health type 2 diabetics risk health tips)

रिसर्चमध्ये काय?

1999 पासून ते 2018 दरम्यान 20 ते 65 वयोगटातील साधारण 17 हजार 300 महिला, मुलींचे संशोधन करण्यात आले होते. या सर्व 17 हजार 300 महिलांना ज्या ज्या वयात मासिक पाळ्या आल्या होत्या,त्यानुसार वयोगट 10, 11,12,13, 14, 15 नुसार कॅटेगरीत विभागण्यात आले होते.

 हे ही वाचा : Rajasthan CM : राजस्थानात वसुंधरा ‘राज’ नाहीच! भजनलाल शर्मा नवे मुख्यमंत्री

कमी वयात मासिक पाळी आलेल्या महिलांना वयाच्या 65 व्या वर्षी स्ट्रोकचा धोका अधिक वाढतो.विशेष करून त्या महिलांना याचा धोका सर्वांधिक असतो, ज्यांना 10 वर्षाच्या आधीच मासिक पाळी यायला सुरूवात झालेली असते असे बीएमजे न्युट्रिशन प्रिवेंशन अँड हेल्थ जर्नलने 5 डिसेंबर रोजी प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटले आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

या महिलांपैकी 1773 महिलांना टाईप टूचा डायबिटीस झाला होता आणि त्यामधील 205 महिलांना हार्ट संबंधित समस्या जाणवत होत्या. या महिलांना वयाच्या 13 व्या वर्षी मासिक पाळी यायला सुरुवात झाली होती.

‘या’ महिलांना अधिक धोका

रिसर्चमधून असेही समोर आले आहे की, ज्या महिलांना 10 वर्षापेक्षा कमी वयात मासिक पाळी यायला सुरुवात झाली होती. त्या महिलांमध्ये टाईप टू डायबिटीजचा धोका 32 टक्के असतो. आणि जर वयाच्या 11 व्या वर्षी मासिक पाळी आली असेल तर 14 टक्के आणि 12 व्या वयात आली तर 29 टक्के धोका असतो.

ADVERTISEMENT

 हे ही वाचा : मुंबईत खळबळ माजवणारी घटना, तरुणीकडून लग्नाआधीच झाली चूक; नंतर नवजात मुलीचा..

या रिसर्चमध्ये असेही आढळून आले की, मधुमेह असलेल्या ज्या स्त्रियांना मासिक पाळी लवकर आली. त्या महिलांमध्ये स्ट्रोकचा धोका वाढला होता. परंतू त्यांना हृदय आणि रक्तवाहिन्या संबंधित कोणताही धोका नाही. ज्या महिलांना वयाच्या 10 व्या मासिक पाळी यायला सुरूवात झाली होती. त्या डायबिटीज असणाऱ्या महिलांना स्ट्रोकचा धोका जवळजवळ तिप्पट होता.

ADVERTISEMENT

जर मासिक पाळी वयाच्या 13 व्या वर्षानंतर आली तर अशा महिलांना असा धोका अजिबात नसतो. कारण जर मासिक पाळी लवकर सुरू झाली तर मेनोपॉज पर्यंत बराच काळ शरीर एस्ट्रोजेनच्या संपर्कात राहते, ज्यामुळे ही समस्या उद्भवू शकते, असे बीएमजेमध्ये प्रसिद्ध झालेल्या संशोधनात म्हटले आहे.

हा रिसर्च अजिबात आश्चर्यकारक नाही आहे. कारण तारूण्याची सुरुवात थेट वजन आणि बॉडी मास इंडेक्स आणि लेप्टीन हार्मोनशी संबंधित आहे. जेव्हा मुलींचे वजन वाढते तेव्हा लेप्टीनची पातळी बदलते आणि ती लहान वयातच तारूण्यात जाऊ लागते, असे नॉट्रे डेम ऑस्ट्रेलिया युनिवर्सिटीमधील हेल्थ रिसर्च इंस्टीट्यूटमध्ये असिस्टंट क्लिनिकल प्रोफेसर असलेल्या डॉ. जूली क्विनलिवन यांनी सांगितले आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT