Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजना सुरु राहणार की बंद? सरकारने दिली आतापर्यंतची सर्वात मोठी अपडेट
Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana Latest Update: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु झाल्यापासून राज्य सरकारकडून नवनवीन माहिती पोस्ट केली जात आहे. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी या योजनेच्य्या माध्यमातून दरमहा 1500 रुपये दिले जात आहेत.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

लाडकी बहीण योजनेबाबत अत्यंत महत्त्वाची माहिती एकदा वाचा

लाडकी बहीण योजना बंद राहणार की सुरु? राज्य सरकारने स्पष्टच सांगितलं...

महिलांना लाडकी बहीण योजनेचा दिवाळी बोनस मिळणार का?
Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana Latest Update: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु झाल्यापासून राज्य सरकारकडून नवनवीन माहिती पोस्ट केली जात आहे. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी या योजनेच्य्या माध्यमातून दरमहा 1500 रुपये दिले जात आहेत. निवडणुका संपल्यानंतर लाडकी बहीण योजना बंद होईल, असा सूर विरोधकांनी आवळला होता. ही योजना सुरु झाल्यापासून महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी ट्वीटरवर लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट दिली आहे. 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरूच राहणार', असं तटकरेंनी स्पष्ट केलं आहे.
आदिती तटकरे यांनी ट्वीटरवर म्हटलंय, "मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरूच राहणार !!मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी जुलै 2024 पासून सुरू झाली आहे. या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील पात्र भगिनींना दरमहा 1,500 रुपये थेट त्यांच्या आधार लिंक केलेल्या बँक खात्यात जमा केले आहेत.
हे ही वाचा >> Maharashtra Weather: धो धो बरसणार! 'या' राज्यांना यलो अलर्ट, महाराष्ट्रात पावसाची स्थिती काय?
शासनाने जुलै, ऑगस्ट, आणि सप्टेंबर 2024 या महिन्यांसाठीचा लाभ आधीच पात्र भगिनींच्या खात्यात जमा केला आहे.तसेच 4 ते 6 ऑक्टोबर 2024 दरम्यान ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यांचा लाभ राज्यातील 2 कोटी 34 लाख पात्र भगिनींना देण्यात आला आहे. सर्व पात्र भगिनींना डिसेंबर महिन्याचा लाभ डिसेंबर महिन्यात देण्यात येणार असून या योजनेबाबत कोणत्याही चुकीच्या माहितीला महाराष्ट्रातील माता भगिनींनी बळी पडू नये ही नम्र विनंती!"
हे ही वाचा >> Horoscope In Marathi: 'या' राशीच्या लोकांसाठी गूड न्यूज! संपत्तीचे वादविवाद मिटतील, तर काहींचा बँक बॅलेन्स वाढेल
दिवाळी बोनस मिळणार का?
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून राज्य सरकारकडून 1500 रुपयांचं आर्थिक सहाय्य दिलं जात आहे. परंतु, दिवाळीच्या पार्श्वभूमीवर या योजनेच्या माध्यमातून महिलांना बोनस दिला जाणार असल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. परंतु, व्हायरल झालेल्या पोस्ट खोट्या असल्याचं मंत्री आदिती तटकरेंनी स्पष्ट केलं. महिलांना अतिरिक्त 2500 रुपयांचा दिवाळी बोनस मिळणार नाही, अशी माहिती राज्य सरकारकडून देण्यात आली.