Pitru Paksha 2024 : नोकरी व्यवसायात समस्या, आर्थिक संकटही येणार; 'या' राशींसाठी पितृ पक्ष कसा असणार?
Pitru Paksha 2024 : मंगळवारी 17 सप्टेंबरपासून पितृ पक्षाची सुरूवात झाली आहे. आणि येत्या 2 ऑक्टोबरला पितृ पक्षाची समाप्ती होणार आहे. या काळात पितरांसाठी तर्पण, पिंड दान, श्राद्ध वगैरे केले जातात. पितृ पक्षात ग्रहण लागल्यामुळे काही राशींवर याचा परिणाम होणार आहे. त्यामुळे 5 राशींच्या लोकांना या काळात अनेक अडचणींचा सामना करावा लागणार आहे?
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

या राशींसाठी पितृ पक्षाचा काळ अडचणीचा

नोकरी,व्यवसायात अनेक समस्या येणार

आर्थिक संकटाचाही सामना करावा लागणार
Pitru Paksha 2024 : मंगळवारी 17 सप्टेंबरपासून पितृ पक्षाची सुरूवात झाली आहे. आणि येत्या 2 ऑक्टोबरला पितृ पक्षाची समाप्ती होणार आहे. या काळात पितरांसाठी तर्पण, पिंड दान, श्राद्ध वगैरे केले जातात. पितृ पक्षात ग्रहण लागल्यामुळे काही राशींवर याचा परिणाम होणार आहे. त्यामुळे 5 राशींच्या लोकांना या काळात अनेक अडचणींचा सामना करावा लागणार आहे? या राशी नेमक्या कोणत्या आहेत? आणि कोणत्या अडचणींना त्यांना सामोरे जावे लागणार आहे? हे जाणून घेऊयात. (pitru paksh 2024 on these zodiac signs period face proble career and money)
यंदा पितृ पक्षाच्या काळात 2 ग्रहण लागले आहेत. मीन राशीत चंद्रग्रहण झाल्यामुळे पितृ पक्षात काही राशींवर याचा वाईट परिणाम होईल. याशिवाय कन्या राशीत सूर्य आणि केतूची युती होत आहे. या दोन कारणांमुळे त्या राशींना करिअरसोबतच आर्थिक संकटाचाही सामना करावा लागू शकतो.
मेष रास : पितृ पक्ष तुमच्यासाठी कठीण जाणार आहे. काही दिवस तुमच्यासाठी अडचणींनी भरलेले असले तरी तुमच्या करिअरमध्ये यश मिळवण्यासाठी तुम्हाला नवीन मार्ग शोधले पाहिजे. तुम्हाला तुमच्या नोकरीबद्दल खूप दिवसांपासून काळजी वाटत असेल, तर आता तुम्ही नोकरी बदलण्याचा विचार केला पाहिजे. या काळात तुम्हाला अनेक आर्थिक संकटांना सामोरं जावं लागेल.
हे ही वाचा : Tirupati Balaji : खळबळजनक, तिरुपती बालाजीच्या लाडूमध्ये जनावरांची चरबी आणि फिश ऑईल... रिपोर्टच आला समोर!
कर्क रास : पितृ पक्षाच्या काळात तुम्हाला नोकरीत अडचणी येऊ शकतात. खर्च वाढल्याने जबाबदाऱ्याही वाढणार आहेत. तुम्ही कितीही केलं तरी तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवता येणार नाही. नोकरी बदलण्याचा विचार तूर्तास बाजूला ठेवणं चांगलं. पुढील काही दिवस तुम्ही सावधगिरी बाळगली पाहिजे.