Chembur Vidhan Sabha Election 2024: ठाकरेंच्या शिलेदाराचं टेन्शन वाढलं, चेंबूर विधानसभेची जागा कशी राखणार?
Chembur Vidhan Sabha Election 2024 Prakash Phaterpekar: लोकसभा निवडणुकीतील मतदानाची आकडेवारी लक्षात घेतल्यास चेंबूर विधानसभा मतदारसंघात शिवसेना (UBT) उमेदवाराला अगदी थोडक्यात मताधिक्य मिळालं आहे. यामुळे तिथले विद्यमान आमदार प्रकाश फातर्पेकर यांची चिंता वाढली आहे.
ADVERTISEMENT

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Chembur Constituency: मुंबई: लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील जनतेने महाविकास आघाडीच्या बाजून कौल दिला आहे. मात्र, असं असलं तरी आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या आमदारांची चिंता वाढू शकते. अशाच काही मतदारसंघांपैकी एक म्हणजे चेंबूर विधानसभा मतदारसंघ. येत्या काही महिन्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत चेंबूरमध्ये कोण बाजी मारणार याकडे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
शिवसेना (UBT) पक्षाचे विद्यमान आमदार प्रकाश फातर्पेकर हे त्यांच्या चेंबूर विधानसभा मतदारसंघात पुन्हा भगवा फडकवू शकतात का? याकडे त्यांच्या कार्यकर्त्यांचंही लक्ष लागून राहिलं आहे. मुंबई दक्षिण-मध्य लोकसभा मतदारसंघाचा निकाल जाहीर झाल्यावर यामध्ये असलेल्या चेंबूर विधानसभा मतदारसंघात विधानसभा निवडणुकीला नेमकं कोण बाजी मारु शकतं याचा अंदाज आम्ही डेटाच्या माध्यमातून वर्तविणार आहोत.
हे ही वाचा>> आदित्य ठाकरेंसाठी धोक्याची घंटा, वरळीची जागा धोक्यात?
मुंबई दक्षिण मध्य मतदारासंघातील शिवसेना (UBT)चे उमेदवार अनिल देसाई सावंत यांनी 53 हजार 384 मतांनी विजय मिळवला. तर शिवसेना (शिंदे गट) उमेदवार राहुल शेवाळे यांना 3,41,754 मतं मिळाली होती. पण या निकालामुळे प्रकाश फातर्पेकर यांचीही डोकेदुखी वाढली आहे. त्यामुळे मुंबई दक्षिण-मध्य लोकसभा मतदारसंघात नेमकं काय घडलंय, हे आपण समजून घेऊया.
मुंबई दक्षिण-मध्य लोकसभा मतदारसंघात शिवसेना (UBT) आणि शिवसेना (शिंदे गट) अशी थेट लढत झाली. शिवसेनेने (शिंदे गट) महायुतीचे उमेदवार म्हणून राहुल शेवाळेंना तिकीट दिलं होतं. तर शिवसेना (UBT)ने महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून अनिल देसाईंना उमेदवारी दिली होती. पण या मतदारसंघात अनिल देसाई यांनी आश्चर्यकारकरित्या विजय मिळवत राहुल शेवाळे यांची खासदारकीची हॅटट्रिक चुकवली.