Pankaja Munde : पंकजा मुंडे कॅबिनेट मंत्री होणार? भाजपमध्ये काय सुरूये खलबतं?
Pankaja Munde News : लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्र भाजपकडून पक्षातंर्गत महत्त्वाचे निर्णय घेतले जात असल्याचे दिसत असून, पंकजा मुंडे यांना ताकद देण्याच्या हालचाली पक्षाकडून सुरू आहेत.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
पंकजा मुंडे राजकारणातील महत्त्वाचा ओबीसी चेहरा
पंकजा मुंडे यांना पुढे आणण्याचे भाजपकडून प्रयत्न
भाजप पंकजा मुंडेंना विधान परिषदेवर घेणार?
Pankaja Munde News : लोकसभा निवडणुकीत भाजप आणि मित्रपक्षांना महाराष्ट्रात प्रचंड फटका बसला आहे. सर्वाधिक फटका भाजपला मराठवाड्यात बसला असून, पक्षाकडून आता पंकजा मुंडेंना पुढे आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यातच आता एक रिपोर्ट समोर आला असून, पंकजा मुंडे यांना कॅबिनेट मंत्री म्हणून संधी दिली जाऊ शकते, असे वृत्त इंडियन एक्स्प्रेसने भाजप नेत्याच्या हवाल्याने दिले आहे.
ओबीसी समाजाचा चेहरा असलेल्या पंकजा मुंडे या गेली पाच वर्ष पक्षातून बाजूला पडल्या होत्या. राज्यातील राजकीय समीकरणे बदलल्याने भाजपकडून लोकसभेला त्यांना संधी देण्यात आली होती. पण, त्यांचा पराभव झाला.
पंकजा मुंडे विधान परिषदेत जाणार?
सूत्रांच्या माहितीनुसार बीड लोकसभा मतदारसंघातून पराभूत झालेल्या पंकजा मुंडे यांना पक्ष विधान परिषदेत पाठवण्याच्या भूमिकेत आहे.
हेही वाचा >> ''पंकजा मुंडेंना धोका दिला'', शिंदेंच्या नेत्याच्या ऑडिओ क्लिपने खळबळ
भाजपमधील विश्वसनीय सूत्रांनी सांगितले की, "देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपच्या राज्य कोअर कमिटीच्या नेत्यांनी पंकजा मुंडे यांना विधान परिषदेत पाठवून शिंदे यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळात घेण्याची शिफारस केली आहे."









