Maharashtra Minister: महायुतीत 'हे' होणार मंत्री?, यादीच आली समोर पण...
महाराष्ट्रात महायुतीचं सरकार आलं असून आता नेमकं कोण-कोण मंत्री होणार याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. जाणून घ्या नेमकी कोणत्या नेत्यांची नावं ही चर्चेत आहेत.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

महाराष्ट्रात महायुतीचं सरकार, कोणाची लागणार मंत्रिमंडळात वर्णी

महायुतीमधून कोणाकोणाला मिळणार संधी

मंत्रिपदासाठी महायुतीचा कसा आहे फॉर्म्युला
मुंबई: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 मध्ये महायुती भरघोस यश मिळालं आहे. एकट्या भाजपला 132 जागा मिळाल्या आहेत तर महायुतीला तब्बल 233 जागा मिळाल्या आहेत. अशावेळी आता महायुतीमध्ये मंत्रिपदासाठी मोठी रस्सीखेच होणार आहे. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील कोणत्या नेत्यांना मंत्रिपद मिळणार यावरून वेगवेगळे अंदाज वर्तवले जात आहेत. दरम्यान, नेमक्या कोणत्या नावांची चर्चा सुरू आहे हे आपण सविस्तर जाणून घेऊया.
महाराष्ट्रात नेमके किती मंत्री होऊ शकतात?
विधानसभेचं संख्याबळ 288 आहे, त्यापैकी 15 टक्के मंत्रिपदाची संख्या आहे. म्हणजे महाराष्ट्रात 43 मंत्री होऊ शकतात. ज्यापैकी 33 कॅबिनेट आणि 10 राज्यमंत्री राहू शकतात.
मंत्रिपदासाठी महायुतीचा काय फॉर्म्युला?
6 आमदारांमागे 1 मंत्रिपद असा महायुतीचा सत्तेचा फॉर्म्युला असू शकतो. भाजपचे 132 आमदार आहेत. त्यामुळे त्यांच्या साधारण 24 मंत्र्यांसह सत्तेत सर्वात मोठा असेल.
हे ही वाचा>> Sharad Pawar: 'निकालानंतर एखादा घरी बसला असता, पण मी काही...', शरद पवारांचं मोठं विधान
यापाठोपाठ शिंदेंच्या शिवसेनेचा नंबर लागेल. कारण त्यांचे 57 आमदार निवडून आले आहेत. त्यामुळे त्यांना 12 मंत्रिपदं मिळू शकतील. तर त्यानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला 10 मंत्रिपदं मिळू शकतात. कारण त्यांचे 41 आमदार निवडून आले आहेत.