Devendra Fadnavis Mumbai Tak Baithak 2024: 'मुख्यमंत्री होणार की दिल्लीत जाणार?'; देवेंद्र फडणवीसांनी सांगितली मनातील गोष्ट
DCM Devendra Fadnavis at Mumbai Tak Baithak 2024 : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुंबई Tak बैठकीत प्रश्न विचारण्यात आला की, 'मुख्यमंत्री होणार की दिल्लीत जाणार?' यावेळी त्यांनी आपल्या मनातील गोष्ट सांगितली.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार की दिल्लीत जाणार?
'आमच्यापेक्षा जास्त अवघड मविआचं', फडणवीसांचा विरोधकांना टोला!
पक्ष फोडण्याच्या स्पर्धेत पवारांना गोल्ड मेडल- फडणवीसांची खोचक टीका
DCM Devendra Fadnavis at Mumbai Tak Baithak 2024 : महाराष्ट्रात लवकरच विधानसभा निवडणूक 2024 चे बिगुल वाजणार आहे. या पार्श्वभूमीवर 'मुंबई Tak' बैठकीचे आयोजन करण्यात आले. यावेळी अनेक राजकीय मुद्दे आणि महाराष्ट्राबद्दलचे पुढील व्हिजन या सर्व गोष्टींवर दिग्गज राजकारण्यांशी सविस्तर चर्चा करण्यात आली. अशा परिस्थितीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही विविध मुद्द्यांवर आपली राजकीय भूमिका मांडली. (DCM Devendra Fadnavis at Mumbai Tak Baithak 2024 he speaks on he would like to become Chief Minister or go to Delhi)
ADVERTISEMENT
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार की दिल्लीत जाणार?
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुंबई Tak बैठकीत प्रश्न विचारण्यात आला की, 'मुख्यमंत्री होणार की दिल्लीत जाणार?' यावेळी त्यांनी आपल्या मनातील गोष्ट सांगितली. फडणवीस म्हणाले, 'भारतीय जनता पक्षात कोणताही निर्णय आपल्या हातात नसतो. आपला निर्णय पक्ष करतो. मी यापूर्वीही सांगितलं आहे, पक्षाने जिथे सांगितलं, ज्या पदावर सांगितलं, जसं सांगितलं त्या पदावर आपण काम करू. एक गोष्ट निश्चित आहे आता मला माझा पक्ष जसा समजतो ते मला महाराष्ट्रात ठेवतील, तिथे काम करायला सांगतील असं मला वाटतं.पण त्यांनी सांगितलं दुसरीकडे करायचंय... अगदी मणिपूरला जाऊन काम करायला सांगितलं तरी माझी तयारी आहे. मला अडचण नाही. पण आता तरी मी महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्रात काम करणार आहे आणि मुख्यमंत्री वैगेरे होणं हा माझा अजेंडा नाही.' अशा स्पष्ट शब्दात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं.
हेही वाचा : Devendra Fadnavis Mumbai tak Baithak 2024: लोकसभेला इतका फटका का बसला? फडणवीस स्पष्टच बोलले
'आमच्यापेक्षा जास्त अवघड मविआचं', फडणवीसांचा विरोधकांना टोला!
'महायुतीला विधानसभेत काऊंटर पोलरायझेशनचा फायदा होईल. शिंदेंना जितकी मतं दिली तितकी दादांना देऊ शकलो नाही. पण काळजी करू नका विधानसभेत जागावाटप नीट होईल. ज्याची जेवढी ताकद तेवढ्या त्यांना जागा मिळणार... नवीन अवतारात शिंदे, दादांची पहिली निवडणूक आहे. मागताना जागा प्रत्येकाला जास्तच मागाव्या लागतात. लोकसभेत ताणून धरलेल्या जागांवर परिणाम झाला. आता जागावाटप लवकर व्हावं यासाठी प्रयत्नशील आहोत. आमच्यापेक्षा जास्त अवघड मविआचं आहे.' असंही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.
हे वाचलं का?
हेही वाचा : Devendra Fadnavis Mumbaitak Baithak 2024 : भाजप विधानसभेच्या किती जागा लढणार?
पक्ष फोडण्याच्या स्पर्धेत पवारांना गोल्ड मेडल- फडणवीसांची खोचक टीका
'फेक नरेटिव्ह एकाच निवडणुकीत चालतो. पवारसाहेब आताही कमीच जागा घेतील. पक्ष फोडण्याची स्पर्धा घेतली तर पवारांना गोल्ड मेडल मिळेल.' अशा खोचक शब्दात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांवर टीका केली.
हेही वाचा : Eknath Shinde Mumbaitak Baithak 2024 : लोकसभा खडतर होती की आता विधानसभा असणार? मुख्यमंत्री शिंदे काय म्हणाले?
लोकसभा निवडणुकीत फटका का बसला?
"लोकसभेचे विश्लेषण केले, तर आमच्या १२ जागा अशा आहेत, जिथे वेगळा पॅटर्न दिसला. तो विधानसभेत दिसणार नाही. आमच्याकडे जी मते होती, त्यात शिवसेना आणि राष्ट्रवादीची मते मिळून विशिष्ट जागा मिळवू असे वाटले होते. पण, दुसरीकडे नवीन पक्ष होते, त्यांची मते एकमेकांना गेली नाहीत."
ADVERTISEMENT
"अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे मते जाणे, सगळ्यात कठीण होते. पण, आता ते विधानसभेला घडणार नाही. आम्ही जितकी मते शिवसेनेकडे ट्रॉन्स्फर करू शकलो, तितकी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे करू शकलो नाही", असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT