Devendra Fadnavis Mumbai tak Baithak 2024: 'ते मी गंमतीत बोललो होतो...', देवेंद्र फडणवीसांचा नवा दावा!
Devendra Fadnavis Maharashtra Assembly election 2024 on Shiv Sena and NCP: दोन पक्ष फोडून राज्यात पुन्हा सत्तेत आलो हे विधान आपण गंमतीत केलं होतं असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.
ADVERTISEMENT

Devendra Fadnavis: मुंबई: 'मी पुन्हा आलो पण येताना दोन पक्ष फोडून आलो...', असं विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा निवडणुकीआधी केलं होतं. ज्यावरून त्यांच्यावर बरीच टीका देखील झाली. ज्याचा काही प्रमाणात भाजपला निवडणुकीतही फटका बसला. पण आता याचबाबत पहिल्यांदाच देवेंद्र फडणवीस हे बोलले आहेत. 'मुंबई Tak बैठक' या विशेष कार्यक्रमात बोलताना फडणवीस यांनी याचबाबत भाष्य केलं आहे. (devendra fadnavis at mumbai tak baithak 2024 i said that in jes Devendra fadnavis new claim about i came back to power after breaking 2 parties)
2019 च्या विधानसभा निवडणुकीआधी विधानसभेत बोलताना देवेंद्र फडणवीसांनी आपल्या भाषणात 'मी पुन्हा येईन...' असं विधान केलं होतं. पण विधानसभा निवडणुकीनंतर जी राजकीय उलथापालथ झाली त्यामुळे फडणवीसांना मुख्यमंत्री पद गमवावं लागलं. ज्यानंतर त्यांना 'पुन्हा येईन' यावरून बरंच ट्रोल केलं गेलं.
हे ही वाचा>> Devendra Fadnavis Mumbai tak Baithak 2024: लोकसभेला इतका फटका का बसला? फडणवीस स्पष्टच बोलले
दरम्यान, दोन वर्षांपूर्वी राज्यात पुन्हा एकदा शिंदे सरकार आलं. ज्यामध्ये फडणवीसांना उपमुख्यमंत्री पद देण्यात आलं. ज्यानंतर लोकसभा निवडणुकीआधी एका मुलाखतीत फडणवीस यांना 'पुन्हा येईन' यावरून प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर फडणवीस म्हणाले की, 'मी सत्तेत पुन्हा आलो.. आणि येताना दोन पक्ष फोडून आलो..'
पण त्यांचं हेच विधान पुन्हा चर्चेत आलं. ज्यावरून ते ट्रोल झाले. याबाबत मुंबई Tak बैठकीत त्यांनी असं विधान का केलं हे सांगितलं. पाहा मुंबई Tak बैठकीत यावर फडणवीस नेमकं काय म्हणाले..










