Rakesh Jhunjhunwala: यशस्वी गुंतवणूकदार बनण्यासाठी राकेश झुनझुनवालांचे 11 वन-लाइनर्स
मुंबई: दलाल स्ट्रीटचे बिग बुल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राकेश झुनझुनवाला यांचं आज सकाळी मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात निधन झालं. ते ६२ वर्षांचे होते. दोन आठवड्यांपूर्वीच राकेश झुनझुनवाला यांना रुग्णालयातून घरी सोडले होते. प्रकृती बिघडल्यानं त्यांना आज पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. सकाळी ६ वाजून ४५ मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. राकेश झुनझुनवाला यांनी आपल्या […]
ADVERTISEMENT

मुंबई: दलाल स्ट्रीटचे बिग बुल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राकेश झुनझुनवाला यांचं आज सकाळी मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात निधन झालं. ते ६२ वर्षांचे होते. दोन आठवड्यांपूर्वीच राकेश झुनझुनवाला यांना रुग्णालयातून घरी सोडले होते. प्रकृती बिघडल्यानं त्यांना आज पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. सकाळी ६ वाजून ४५ मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
राकेश झुनझुनवाला यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात अनेक गुंतवणूकदारांना आकर्षित केले. मोटिवेशनल स्पिकर म्हणून देखील त्यांच्याकडे पाहिलं जायचं. त्यांच्याकडे पाहून अनेक जणांनी शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केली होती. झुनझुनवाला यांची भारताबद्दलची दूरदृष्टी कायम स्मरणात राहील. भारतातील अनेक गुंतवणूकदारांना पुढे जाण्यासाठी ते कायम मार्गदर्शन म्हणून स्मरणात राहतील.
राकेश झुनझुनवालांचे 11 वन-लाइनर्स
1. शेअर मार्केट कायम महिलांसारखे असते. नेहमी कमांडिंग, रहस्यमय, अंदाज न बांधता येणारं आणि अस्थिर.
2. नेहमीस लाटेच्या विरुद्ध दिशेला जा. जेव्हा इतर शेअर विकत असतील तेव्हा खरेदी करा आणि जेव्हा इतर खरेदी करत असतील तेव्हा विक्री करा.