अत्याचाराचा कळस! चिमुकलीच्या गळ्यावर चाकू ठेवून नराधमाने आईवर केला बलात्कार

मुंबई तक

महाराष्ट्रात गेल्या काही महिन्यांपासून महिलांविरुद्घ होणाऱ्या गुन्ह्यांमध्ये वाढ होताना दिसत आहे. नाशिकमध्ये असाच एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ज्यात आरोपीने चिमुरडीच्या गळ्यावर चाकू ठेवत तिच्या आईवर बलात्कार केला आहे. मुलीला ठार मारण्याची धमकी आरोपीने तिच्या आईवर अनेकदा बलात्कार केल्याचं समोर आलं आहे. नाशिकमधल्या सातपूर पोलिसांनी या घटनेत गुन्हा दाखल करत आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

महाराष्ट्रात गेल्या काही महिन्यांपासून महिलांविरुद्घ होणाऱ्या गुन्ह्यांमध्ये वाढ होताना दिसत आहे. नाशिकमध्ये असाच एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ज्यात आरोपीने चिमुरडीच्या गळ्यावर चाकू ठेवत तिच्या आईवर बलात्कार केला आहे. मुलीला ठार मारण्याची धमकी आरोपीने तिच्या आईवर अनेकदा बलात्कार केल्याचं समोर आलं आहे. नाशिकमधल्या सातपूर पोलिसांनी या घटनेत गुन्हा दाखल करत आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार आझाद शेख असं या आरोपीचं नाव आहे. आरोपीने पीडित महिलेला त्र्यंबकेश्वर येथील एका लॉजवर नेऊन तिच्यावर रात्रभर शाररिक अत्याचार केला. पीडित महिलेने या नराधमाच्या तावडीतून सुटत पळून जाण्याचा प्रयत्न केला. परंतू आरोपीने पीडित महिलेच्या मुलीच्या गळ्यावर चाकू ठेवत तिला जिवे मारण्याची धमकी दिली. यानंतर आरोपीने या पीडित महिलेवर अशाच पद्धतीने विविध ठिकाणी बलात्कार केला.

१७ डिसेंबर रोजी पीडित महिलेवर रात्रभर बलात्कार केल्यानंतर आरोपी पीडितेला मित्राच्या घरी घेऊन गेला. याठिकाणी देखील आरोपीनं पीडितेवर जबरदस्ती करत शारीरिक संबंध ठेवले. या प्रकारानंतर आरोपीनं पीडित महिलेला नाशिकमध्ये सोडून पळ काढण्याचा प्रयत्न केला. पण पीडित महिलेनं नाशिक रोड पोलीस ठाण्यात जाऊन आरोपीविरोधात फिर्याद दाखल केली आहे.

Crime: अश्लील फोटो काढून मुलींना करायचा ब्लॅकमेल, पीडित तरुणींनी ‘असा’ काढला काटा

हे वाचलं का?

    follow whatsapp