भाजप नेत्या पंकजा मुंडे दुसऱ्यांदा कोरोना पॉझिटिव्ह, मुंबईतल्या घरी क्वारंटाईन
राज्यात कोरोनाचा उद्रेक पुन्हा एकदा वाढतो आहे. अशातच महाराष्ट्रातल्या सरकारमधले मंत्री विरोधी पक्षातले नेते यांनाही कोरोनाची बाधा होते आहे. भाजपच्या राष्ट्रीय सरचिटणीस पंकजा मुंडे यांना दुसऱ्यांना कोरोना झाला आहे. पंकजाताईंनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. मुंबईतील निवासस्थानी आपण क्वारंटाईन झाल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. तसंच प्रकृती चांगली असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. काय आहे पंकजा मुंडे […]
ADVERTISEMENT

राज्यात कोरोनाचा उद्रेक पुन्हा एकदा वाढतो आहे. अशातच महाराष्ट्रातल्या सरकारमधले मंत्री विरोधी पक्षातले नेते यांनाही कोरोनाची बाधा होते आहे. भाजपच्या राष्ट्रीय सरचिटणीस पंकजा मुंडे यांना दुसऱ्यांना कोरोना झाला आहे. पंकजाताईंनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. मुंबईतील निवासस्थानी आपण क्वारंटाईन झाल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. तसंच प्रकृती चांगली असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.
काय आहे पंकजा मुंडे यांचं ट्विट?
‘Corona बाधित लोकांच्या संपर्कात आल्याचे जाणवल्याबरोबर मी विलग झाले आहे.. चाचणी केली…लक्षणं आणि Corona दोन्ही आहे… सर्वानी काळजी घ्यावी..’
Corona बाधीत लोकांच्या संपर्कात आल्याचे जाणवल्या बरोबर मी विलग झाले आहे.. चाचणी केली…लक्षणं आणि Corona दोन्ही आहे… सर्वानी काळजी घ्यावी..
— Pankaja Gopinath Munde (@Pankajamunde) January 1, 2022
पंकजा मुंडे या परभणीच्या जिंतूर तालुक्यातील धमधम इथं एका कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. भगवानबाबा यांच्या मंदिराचा कलश रोहणासाठी त्या हेलिकॉप्टरने धमधममध्ये पोहोचल्या होत्या. या कार्यक्रमात भाषण केल्यानंतर त्यांनी त्यांना भूक लागल्याचं सांगितलं. तसंच आपण कुठल्या बंद खोलीत जेवणार नसल्याचं त्यांनी सांगितलं होतं. त्यानंतर उपस्थित लोकांसोबतच त्यांना स्टेजवर जेवण वाढण्यात आलं होतं. त्यानंतर चार दिवसांनी त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानं आता चिंता वाढली आहे.