या भीतीपोटी तर तुम्हाला झोप लागत नाही ना? गोपीचंद पडळकरांचा नवाब मलिकांना बोचरा प्रश्न
मुंबईत NCB ने क्रूझवरील ड्रग्ज पार्टीवर छापा मारुन केलेल्या कारवाईनंतर राज्यात महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असा नवा वाद सुरु आहे. NCB २ ऑक्टोबर रोजी केलेल्या छापेमारीत भाजपशी संबंधित काही लोकांना सोडून दिल्याचा आरोप राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत केला होता. नवाब मलिकांच्या या आरोपांना भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी उत्तर दिलंय. “नवाब मलिक […]
ADVERTISEMENT

मुंबईत NCB ने क्रूझवरील ड्रग्ज पार्टीवर छापा मारुन केलेल्या कारवाईनंतर राज्यात महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असा नवा वाद सुरु आहे. NCB २ ऑक्टोबर रोजी केलेल्या छापेमारीत भाजपशी संबंधित काही लोकांना सोडून दिल्याचा आरोप राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत केला होता. नवाब मलिकांच्या या आरोपांना भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी उत्तर दिलंय.
“नवाब मलिक यांना बिनबुडाचे आरोप करायची सवय आहे. भंगाराचा व्यवसाय करता करता त्यांनी आपली मतीही भंगारात विकली आहे. शाहरुख खानचा मुलगा व अन्य पार्टी करत असलेल्या त्या क्रूझवर तेराशे लोकं प्रवास करत होती, ज्यात तुमचेही काही जवळचे आहेत. तपासाअंती ज्यांच्यावर गुन्हा सिद्ध झाला त्यांनाच NCB ने अटक केली आहे. उर्वरित लोकांना NCB ने सोडलं आहे. तुमचं सरकार वसुलीत गुंग असल्यामुळे कारवाई NCB ला करावी लागली.”
आर्यन खानला क्रूझवर कुणी बोलवलं?; नवाब मलिकांनी पत्रकार परिषदेत घेतलं नाव
यावेळी पडळकरांनी नवाब मलिकांना तुमच्या जावयाला जेव्हा ड्रग्ज केसमध्ये अटक झाली तेव्हा तुम्ही कशासाठी गप्प होतात? असा प्रश्न विचारला. नवाब मलिकांना मुळात चिंता आर्यनची आहे की त्यांना ड्रग्ज विक्री करणाऱ्या टोळक्याची? NCB ने सखोल तपास केल्यानंतर तुमचे ड्रग्ज टोळक्यांशी असणारे लागेबांधे उघडे पडणार आहेत, या भितीने तर तुम्हाला झोप लागत नाहीये ना असा सवाल करत पडळकरांनी मलिकांना टीकेचं लक्ष्य केलं आहे.
दरम्यान नवाब मलिकांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत, एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांचे कॉल रेकॉर्ड तपासण्यात यावेत अशी मागणी केली आहे. समीर वानखेडे मीडियाला हे सांगत आहेत की आठ ते दहा लोक होते. मात्र प्रत्यक्षात अकरा जणांना ताब्यात घेण्यात आलं होतं. मुंबई पोलिसांनाही ही माहिती सकाळपर्यंत मिळाली होती की एकूण 11 जणांना ताब्यात घेण्यात आलं होतं. मात्र बातम्या अशा आल्या की आठ ते दहा लोकांना ताब्यात घेण्यात आलं. या प्रकरणात तिघांना सोडून देण्यात आलं असाही आरोप नवाब मलिक यांनी केला आहे.
Nawab Malik On NCB ‘क्रुझ पार्टीतून भाजप नेत्याच्या मेहुण्यासह तिघांना का सोडलं? समीर वानखेडेंचे कॉल तपासावेत’