Holiday Calendar: पाहा 2022 साली किती आहेत सुट्ट्या?

Holiday Calendar of India 2022: 2022 साली अनेक सुट्ट्या येणार आहेत. जाणून घ्या कोणत्या दिवशी कोणती सुट्टी आहे.
Holiday Calendar: पाहा 2022 साली किती आहेत सुट्ट्या?
holiday calendar of india 2022 holidays festivals listप्रातिनिधिक फोटो (Photo: Getty Images)

Holiday Calendar of India 2022: मुंबई: नवं वर्ष सुरू होण्यासाठी आता अवघे काही महिने उरले आहेत. प्रत्येकाला आशा आहे की 2022 हे वर्ष केवळ आनंदच घेऊन येणार नाही, तर वाईट काळ देखील संपवेल. दरम्यान, सुट्ट्यांच्या बाबतीतही 2022 हे वर्ष देखील खूप खास असणार आहे. 2021 प्रमाणे 2022 मध्येही एकूण 42 सरकारी सुट्या असतील.

जाणून घ्या या सुट्ट्या कशा असतील? पण या सुट्ट्या नेमक्या कोणत्या तारखेला आणि वारी असणार हे जाणून घेणंही महत्त्वाचं आहे. कारण मित्रांसोबत फिरणे असो किंवा कुटुंबासोबत गावाला जाणे असो, सुट्टीचे कॅलेंडर पाहूनच आपण आपलं प्लॅनिंग करावं लागतं.

सन 2022 मध्ये 18 राजपत्रित (गॅझेटेड) सुट्ट्या असतील. तर उर्वरित मर्यादित सुट्या असतील. मर्यादित सुट्ट्या म्हणजे ज्यादिवशी संस्थेचा मालक किंवा कोणतीही कंपनी कर्मचाऱ्यांसाठी कार्यालय सुरु ठेऊ शकतं. पण साधारणपणे या दिवशी कार्यालये बंद असतात. जसं की, नववर्ष, वसंत पंचमी, लोहरी, जन्माष्टमी, रक्षाबंधन किंवा गुरु नानक जयंती हे सर्व सण रिस्ट्रिक्टेड सुट्ट्यांच्या श्रेणीत येतात.

2022 मध्ये कोणत्या तारखांना कोणती सुट्टी असेल?

 • जानेवारीमधील सुट्ट्या - 1 जानेवारी (नवीन वर्ष), 14 जानेवारी (मकर संक्रांती), 14 जानेवारी (पोंगल), 26 जानेवारी (प्रजासत्ताक दिन),

 • फेब्रुवारीमधील सुट्ट्या - 5 फेब्रुवारी (वसंत पंचमी), 15 फेब्रुवारी (हजरत अलींचा वाढदिवस) 16 फेब्रुवारी ( गुरु रविदास जयंती), 19 फेब्रुवारी (शिवाजी जयंती), २६ फेब्रुवारी (महर्षी दयानंद सरस्वती जयंती) आणि २८ फेब्रुवारी (महाशिवरात्री).

 • मार्चमधील सुट्ट्या - 17 मार्च (होळी), 18 मार्च (डोलयात्रा), 20 मार्च (पारशी नववर्ष),

 • एप्रिलमधील सुट्ट्या - 13 एप्रिल (बैसाखी), 14 एप्रिल ( महावीर जयंती), 15 एप्रिल (गुड फ्रायडे), 17 एप्रिल (इस्टर) आणि 29 एप्रिल (जमात-उल-विदा)

 • मेमधील सुट्ट्या - 7 मे (रवींद्रनाथ जन्मदिवस), 15 मे (बुद्ध पौर्णिमा),

 • जुलैमधील सुट्ट्या - 30 जुलै (मोहरम)

 • ऑगस्टमधील सुट्ट्या - 11 ऑगस्ट (रक्षा बंधन), 15 ऑगस्ट (स्वातंत्र्य दिन), 18 ऑगस्ट (जन्माष्टमी) आणि 30 ऑगस्ट (गणेश चतुर्थी-विनायक चतुर्थी).

 • सप्टेंबरमधील सुट्ट्या - 7 सप्टेंबर (ओनम)

 • ऑक्टोबरमधील सुट्ट्या - 2 ऑक्टोबर (महात्मा गांधी जयंती), 4 ऑक्टोबर (दसरा), 8 ऑक्टोबर (मिलाद उन-नबी), 9 ऑक्टोबर (महर्षी वाल्मिकी जयंती), 24 ऑक्टोबर (नरक चतुर्दशी) , 24 ऑक्टोबर (दीपावली), 25 ऑक्टोबर (गोवर्धन पूजा), 26 ऑक्टोबर (भाऊबाजी), 30 ऑक्टोबर (छठ पूजा)

 • नोव्हेंबरमधील सुट्ट्या - 24 नोव्हेंबर (गुरू तेग बहादूर शहीद दिन)

 • डिसेंबरमधील सुट्ट्या - 25 डिसेंबर (ख्रिसमस डे)

या सुट्ट्या येणार शनिवार-रविवारी

शनिवार-रविवारी कोणताही सण आला तर समजा तुमची एक सुट्टी वायाच जाते. पण हा सण इतर कोणत्याही दिवशी आल्यास आठवड्यातील एक सुट्टी हमखास वाढते. 2022 च्या कॅलेंडरवर नजर टाकल्यास यावेळीही शनिवार-रविवारनी अनेक सुट्ट्या आल्या आहेत. त्यामुळे बऱ्याच सुट्ट्यांवर पाणी सोडावं लागणार आहे.

holiday calendar of india 2022 holidays festivals list
१ एप्रिलपासून तुमचा आठवडा फक्त ४ दिवसांचा??

2022 या वर्षाची सुरुवात शनिवारपासूनच होणार आहे. म्हणजेच नवीन वर्ष शनिवारी आल्याने आपली सुट्टी कमी होणार आहे. फेब्रुवारीमध्ये 5 तारखेला वसंत पंचमी आणि 26 फेब्रुवारीला दयानंद सरस्वती जयंती आहे. हे दोन्ही सण शनिवारी आल्यास दोन सुट्ट्यांचे नुकसान होणार आहे. त्यानंतर शनिवार 19 फ्रेबुवारी रोजी शिवजयंती आहे. त्यामुळे अनेकांची ही सुट्टी गेली आहे. 30 जुलै रोजी मोहरम असल्याने ही सुट्टी देखील जाणार आहे.

यानंतर ऑक्टोबरमध्ये सलग चार सुट्ट्या जाणार आहेत. 2 ऑक्टोबर (महात्मा गांधी जयंती), 9 ऑक्टोबर (महर्षी वाल्मिकी जयंती) आणि 30 ऑक्टोबर (छठ पूजा) आहे आणि हे सर्व सण शनिवारी येत आहेत.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in