Maharashtra HSC Result: 2020 साली बारावीच्या निकालाचा नेमका ट्रेंड कसा होता?
HSC Maharashtra Result 2021: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) महाराष्ट्र बोर्ड बारावीची परीक्षा कोरोना संर्सगामुळे होऊ शकली नाही. त्यामुळे अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे निकाल जाहीर करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यामुळे आता पुढील काही दिवसात निकाल जाहीर होऊ शकतो. त्यामुळे या निकालाकडे (Maharashtra HSC result 2021) विद्यार्थ्यांचं लक्ष लागलं. बारावीचा निकाल हा […]
ADVERTISEMENT

HSC Maharashtra Result 2021: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) महाराष्ट्र बोर्ड बारावीची परीक्षा कोरोना संर्सगामुळे होऊ शकली नाही. त्यामुळे अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे निकाल जाहीर करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यामुळे आता पुढील काही दिवसात निकाल जाहीर होऊ शकतो. त्यामुळे या निकालाकडे (Maharashtra HSC result 2021) विद्यार्थ्यांचं लक्ष लागलं.
बारावीचा निकाल हा विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा असतो. कारण इथूनच विद्यार्थी आपल्या करिअरच्या दृष्टीने नवी वाट निवडत असतात. त्यामुळे बारावीचा निकाल हा त्यांच्यासाठी अत्यंत निर्णायक असतो. कोरोना संकटामुळे परीक्षा होणार की नाही याबाबत विद्यार्थ्यांमध्ये शेवटच्या क्षणापर्यंत संभ्रम कायम होता. अखेर राज्य सरकारने कोरोनाचं संकट लक्षात घेऊन परीक्षा रद्द केली. ज्यानंतर आता अंतर्गंत मूल्यमापनाद्वारे निकाल जाहीर केला जाईल.
दरम्यान, गेल्या वर्षी (HSC Result 2020) राज्यातील बारावीच्या निकालाचा ट्रेंड कसा होता हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
2020 साली राज्यातील बारावीच्या परीक्षेचा निकाल 16 जुलै 2020 हा 90.66 टक्के इतका होता. त्यामुळे आता बारावीचा निकाल किती टक्के लागणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.