Independence Day: कुणी आयुष्य वेचलं, कुणी बलिदान दिलं! ‘हे’ आहेत स्वतंत्र भारताचे १० युद्धवीर

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाली आहेत. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव देशभरात साजरा केला जातो आहे. १५ ऑगस्ट १९४७ ला भारताला स्वातंत्र्य मिळालं. या स्वातंत्र्य संग्रामात अनेकांना आपल्या प्राणांची आहुती द्यावी लागली. सगळ्या स्वातंत्र्य सैनिकांनी जी चळवळ उभी केली त्यानंतर आपला देश स्वतंत्र झाला. भारत स्वतंत्र झाल्यानंतरही पाच मोठी युद्धं झाली जेव्हा आपल्या देशातल्या शेकडो वीरांनी बलिदान दिलं.

देश स्वतंत्र झाल्यापासून आपल्या लष्कराने पाच युद्धं केली

आपला देश जेव्हा स्वतंत्र झाला तेव्हा आपल्या देशाची फाळणी झाली. भारत आणि पाकिस्तान असे दोन देश निर्मिले गेले. मात्र तेव्हापासून पाकिस्तानने भारताच्या कुरापती काढणं सुरू केलं. भारताकडे जेव्हा आपल्या शेजारी देश असलेल्या चीन आणि पाकिस्तानने वाकडी नजर करून पाहिलं तेव्हा तेव्हा आपण त्यांना जशास तसं उत्तर दिलं. भारत स्वतंत्र झाल्यानंतर आपल्या सैन्याने एकूण पाच युद्ध केली. त्यातली चार पाकिस्तानसोबत झाली तर एक चीनसोबत झालं.

भारतात झालेली पाच प्रमुख युद्ध कुठली आहेत?

पहिलं युद्ध- १९४७-४८ भारत आणि पाकिस्तान यांच्यात हे युद्ध झालं. हे युद्ध ४४१ दिवस सुरू होतं

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

दुसरं युद्ध-१९६२- हे युद्ध भारत आणि चीन दरम्यान झालं जे ३२ दिवस सुरू होतं

तिसरं युद्ध-१९६५ मध्ये हे युद्ध झालं जे भारत पाकिस्तानच्या दरम्यान झालं आणि ते ५० दिवस सुरू होतं

ADVERTISEMENT

चौथं युद्ध-१९७१ मध्ये झालं जे १३ दिवस सुरू होतं

ADVERTISEMENT

पाचवं युद्ध १९९९ मध्ये झालं जे ८५ दिवस सुरू होतं

या पाचही युद्धांमध्ये आपल्या सैन्यदलाने, नौदलाने आणि हवाई दलाने प्राणांची बाजी लावली आणि आपला देश वाचवला. आपल्या देशात असे अनेक सैनिक होऊन गेले ज्यापैकी कुणी प्राणांची आहुती दिली तर कुणी आपलं आयुष्य देशासाठी खर्च केलं. लष्कर, वायुदल आणि नौदल या तिन्ही दलांच्या सैनिकांनी दिलेली ही आहुती देश कधीही विसरणार नाही. आपण स्वातंत्र्य दिनानिमित्त जाणून घेणार आहोत अशाच दहा वीरांबाबत

वीर अब्दुल हमीद

कंपनी क्वार्टर मास्टर हवालदार अब्दुल हमीद भारतीय सेनेचे असे सैनिक होते ज्यांना १९६५ च्या युद्धात त्यांचे प्राण गमवावे लागले. भारत आणि पाकिस्तानच्या दरम्यान हे युद्ध झालं होतं. खेमकरण सेक्टरच्या दरम्यान लढत असताना त्यांना वीरमरण आलं. त्यांच्या अतुलनीय शौर्याबाबत त्यांना परमवीर चक्र देऊन गौरवण्यात आलं आहे.

मार्शल ऑफ एअर फोर्स अर्जन सिंह

अर्जन सिंह यांचं पूर्ण नाव अर्जन सिंह औलख असं होतं. ते भारताच्या वायुसेनेतले अधिकारी होते. १६ सप्टेंबर १९९८ ला वयाच्या ९८ व्या वर्षी निधन झालं. भारतीय वायुसेनेच्या प्रमुख पदावर ते १९६४ ते १९६९ या कालावधीत होते. १९६५ च्या युद्धाच्या दरम्यान वायुसेनेची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर होती. त्यांना भारत सरकारने पद्मविभूषण हा पुरस्कार देऊन गौरवलं होतं.

फिल्ड मार्शल माणेक शॉ

फिल्ड मार्शल माणेक शॉ याचं पूर्ण नाव सॅम होर्मूसजी फ्रेमजी जमशेदजी माणेकशॉ असं होतं. १९६९ मध्ये त्यांना लष्कर प्रमुख हे पद देण्यात आलं. १९७१ मध्ये भारत-पाकिस्तान युद्ध झालं तेव्हा लष्कराचं नेतृत्व सर माणेक शॉ यांच्याकडे होतं. १९७१ मध्ये भारताने पाकिस्तानवर विजय मिळवला. या युद्धानंतर बांगलादेशाची निर्मिती झाली. वृद्धापकाळात सर माणेक शॉ यांना फुफ्फुसांचा आजार झाला होता. ज्यामुळे ते कोमात गेले. २७ जून २००८ ला त्यांचा मृत्यू झाला.

ब्रिगेडियर मोहम्मद उस्मान

ब्रिगेडियर मोहम्मद उस्मान हे ३ जुलै १९४८ ला पाकिस्तानी सैनिकांशी लढताना शहीद झाले. त्यानंतर त्यांच्या अतुलनीय शौर्यासाठी त्यांना महावीर चक्र हा पुरस्कार मरणोत्तर देऊन गौरवण्यात आलं. ब्रिगेडियर मोहम्मद उस्मान हे भारतीय लष्करातले एक शूर अधिकारी होते. जेव्हा देशाचं विभाजन झालं तेव्हा त्यांनी पाकिस्तानमध्ये जाण्यास नकार दिला ते भारतातच राहिले. भारतासाठी त्यांनी मृत्यू पत्करला. जर ब्रिगेडियर मोहम्मद उस्मान हे जर युद्धात वाचले असते तर ते स्वतंत्र भारताचे पहिले मुस्लिम लष्कर प्रमुख झाले असते.

ब्रिगेडियर कुलदीप सिंह चांदपुरी

ब्रिगेडियर कुलदीप सिंह चांदपुरी हे १९६२ मध्ये भारतीय लष्करात भरती झाले होते. १९६५ मध्ये जे युद्ध झालं त्यात पश्चिमी सेक्टरमध्ये त्यांना तैनात करण्यात आलं होतं. त्यांना त्यांच्या लोंगेवाला येथील कामगिरीसाठी महावीर चक्र देऊन सन्मानित करण्यात आलं आहे. बॉलिवूडमधला बॉर्डर हा सिनेमा कुलदीप सिंह चांदपुरी यांच्या शौर्यावर आधारित आहे. अभिनेता सनी देओलने ब्रिगेडियर कुलदीप सिंह चांदपुरी यांची भूमिका साकारली आहे.

लेफ्टनंट मनोज कुमार पांडे

३ जुलै १९९९ मध्ये काश्मीरच्या कारगील युद्धात मनोज कुमार पांडे यांना वीरमरण आलं. त्यांना मरणोत्तर परमवीर चक्र देऊन सन्मानित करण्यात आलं. पुण्याजवळच्या खडकवासला या ठिकाणी NDA या ठिकाणी त्यांनी सैन्यदलाचं प्रशिक्षण घेतलं होतं.

कॅप्टन विक्रम बत्रा

कॅप्टन विक्रम बत्रा ७ जुलै १९९९ ला कारगील युद्धात शहीद झाले. त्यांनाही मरणोत्तर परमवीर चक्र देऊन येण्यात आलं आहे. ११९६ मध्ये ते लष्करात भरती झाले होते. १९९७ मध्ये त्यांना सोपोर भागात १३ जम्मू काश्मीरमध्ये रायफल्स या ठिकाणी लेफ्टनंट या पदावर नियुक्ती झाली होती. १९९९ मध्ये त्यांनी कमांडो ट्रेनिंगसह इतरही प्रशिक्षण घेतलं. १ जून १९९९ ला त्यांच्या तुकडीला कारगील युद्धात पाठवलं गेलं तिथे ते शहीद झाले.

ग्रेनेडियर योगेंद्र सिंह यादव

योगेंद्र सिंह यादव यांनाही १९९९ ला झालेल्या कारगील युद्धात वीरमरण आलं. ग्रेनेडियर यादव हे कमांडे प्लाटून घातकचा भाग होते. १९ व्या वर्षी त्यांना वीरमरण आलं. इतक्या कमी वयात देशासाठी शहीद झाल्यानंतर त्यांनी जे योगदान देशासाठी कारगील युद्धात दिलं त्यामुळे त्यांना परमवीर चक्र हा पुरस्कार मरणोत्तर देऊन सन्मानित करण्या आलं. त्यांनी या युद्धात अतुलनीय शौर्य आणि साहस यांचं दर्शन घडवलं होतं. सुरूवातीच्या चार तासांमध्ये त्यांनी टायगर हिल्स या ठिकाणी असलेल्या तीन बंकरवर त्यांच्या घातक तुकडीने कब्जा केला होता.

कॅप्टन हनीफुद्दीन

देशाची राजधानी दिल्लीत राहणारे हनीफुद्दीन यांचा जन्म २३ ऑगस्ट १९७४ ला झाला होता. हनीफुद्दीन ८ वर्षांचे होते तेव्हाच त्यांचे वडील वारले. मोठे झाल्यानंतर हनीफुद्दीन हे लष्करात सहभागी झाले. ६ जून १९९९ ला लडाखच्या तुरतुक भागात १८ हजार फुटांच्या उंचीवर ऑपरेशन थंडरबोल्ट सुरू केलं होतं. ११ राजपुताना रायफल्स ची तुकडी हे ऑपरेशन पाहात होती. हे पूर्ण ऑपरेशन हनीफुद्दीन यांच्या नेतृत्वात सुरू होतं. १८ हजार ५०० फुटांवर मायनस तापमान असूनही त्यांचं शौर्य कमी झालं नाही. त्याचवेळी हनीफुद्दीन यांच्या तुकडीवर शत्रूने गोळीबार सुरू केला. तरीही हनीफुद्दीन हे पुढे गेले. आपल्या सहकाऱ्यांची तुकडी कमी आहे हे त्यांना लक्षात आलं होतं ती त्यांनी सुरक्षित केली आणि स्वतः पुढे झाले शत्रूचं लक्ष विचलित केलं. त्याचवेळी त्यांचा मृत्यू झाला. स्वतःच्या प्राणांची बाजी लावत हनीफुद्दीन यांनी आपल्या सहकाऱ्यांचे प्राण वाचवले. त्यांच्या या शौर्याबद्दल त्यांना वीरचक्र देऊन गौरवण्यात आलं.

कॅप्टन अनुज नायर

कॅप्टन अनुज नायर यांनीही NDA मधून लष्करांचं प्रशिक्षण घेतलं. १९९९ मध्ये त्यांनाही कारगीलच्या मोहिमेवर पाठवण्यात आलं होतं. या युद्धात शौर्य आणि साहस दाखवलं. ७ जुलै १९९९ ला ते युद्धात शहीद झाले. त्यांना मरणोत्तर महावीर चक्र पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT