पंजाबच्या घटनेमागे गृहमंत्री अमित शाह यांचा हात तर नाही ना? नाना पटोले यांचा गंभीर आरोप

मुंबई तक

पंजाबमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेबाबत जी त्रुटी राहिली त्यावरून वाद निर्माण झाला आहे. अशात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा तर या घटनेमागे हात नाही ना? असा प्रश्न महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. पंतप्रधानांचा दौरा असतो तेव्हा 15 दिवसांपूर्वीपासून सर्व सुरक्षेच्या व्यवस्था पाहिल्या जातात. तीन गुप्तचर यंत्रणांकडून […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

पंजाबमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेबाबत जी त्रुटी राहिली त्यावरून वाद निर्माण झाला आहे. अशात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा तर या घटनेमागे हात नाही ना? असा प्रश्न महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

पंतप्रधानांचा दौरा असतो तेव्हा 15 दिवसांपूर्वीपासून सर्व सुरक्षेच्या व्यवस्था पाहिल्या जातात. तीन गुप्तचर यंत्रणांकडून माहिती घेतली जाते. एसपीजी या सर्वांचं कंट्रोल करत असते. एसपीजी गृहखात्यांतर्गत येते. अमित शहा हे या यंत्रणांचे प्रमुख आहेत. त्यामुळे या घटनेमागे अमित शाह यांचा हात तर नाही ना हा प्रश्न आहे. देशाच्या गृहमंत्र्यांनीच त्याचं उत्तर दिलं पाहिजे. असं करून काही डाव तर साधायचा नव्हता ना हेही सांगितलं पाहिजे, अशा शंका पटोले यांनी उपस्थित केल्या.

‘काँग्रेसचे खुनी इरादे फसले’, PM मोदींच्या सुरक्षेबाबत झालेल्या चुकीनंतर स्मृती इराणी संतापल्या

पाच राज्यात निवडणुका जिंकण्यासाठी नौटंकी सुरू आहे. भाजप जनतेचे प्रश्न, महागाई बेरोजगारी जनतेचे प्रश्न यावरील विषय डायव्हर्ट करण्यासाठी या पद्धतीने काम करत असते. पंतप्रधान रोज अनेक रुप बदलत असतात. त्या पद्धतीने आजही त्यांनी तेच केलं. पंजाबमध्ये रिकाम्या खुर्च्या होत्या म्हणून नौटंकी सुरू असेल. या प्रकरणी पंजाब सरकारने अधिकाऱ्यांच्या माध्यमातून चौकशी सुरू केली आहे. त्यातून दूध का दूध पानी का पानी व्हावं, असंही ते म्हणाले.

हे वाचलं का?

    follow whatsapp