WHO च्या नकाशात जम्मू-काश्मीर PAK आणि चीनच्या भूभागात, TMC खासदाराचं PM मोदींना पत्र

मुंबई तक

नवी दिल्ली: जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) जम्मू आणि काश्मीरला पाकिस्तान आणि चीनचा भाग म्हणून दाखविल्याबद्दल तृणमूल काँग्रेसचे राज्यसभा खासदार डॉ. शंतनू सेन यांनी तीव्र आक्षेप नोंदवला आहे. डॉ. सेन यांनी याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर याला तीव्र विरोध करण्याची मागणी केली आहे. या गोष्टीकडे पंतप्रधानांचे लक्ष वेधण्यासाठी डॉ. सेन यांनी पत्रात […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

नवी दिल्ली: जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) जम्मू आणि काश्मीरला पाकिस्तान आणि चीनचा भाग म्हणून दाखविल्याबद्दल तृणमूल काँग्रेसचे राज्यसभा खासदार डॉ. शंतनू सेन यांनी तीव्र आक्षेप नोंदवला आहे. डॉ. सेन यांनी याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर याला तीव्र विरोध करण्याची मागणी केली आहे.

या गोष्टीकडे पंतप्रधानांचे लक्ष वेधण्यासाठी डॉ. सेन यांनी पत्रात लिहलं आहे की, ‘मला तुमच्या लक्षात आणून द्यायचे आहे की, कोव्हिडची जागतिक स्थिती जाणून घेण्यासाठी मी WHO वेबसाइटवर गेलो तेव्हा मला नकाशा दिसला.’

WHO ने तयार केला वादग्रस्त नकाशा

डॉ. सेन यांनी पुढे लिहिले आहे की, ‘जेव्हा मी हा नकाशा झूम करून पाहिला तेव्हा मला धक्काच बसला. कारण जम्मू आणि काश्मीर दोन वेगवेगळ्या रंगात दाखवले आहे. जेव्हा मी भारताच्या निळ्या भागानंतर दुसऱ्या भागावर क्लिक केले तेव्हा त्यात पाकिस्तानची कोरोना स्थिती दिसू लागली, तर दुसऱ्या भागात चीनची आकृती दिसू लागली.’

हे वाचलं का?

    follow whatsapp