महाराष्ट्रातील निर्बंधांमध्ये महत्वाचे बदल : ब्युटी पार्लर आणि जिम ५० टक्के क्षमतेने सुरु राहणार
कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येवर निर्बंध आणण्यासाठी राज्य सरकारने शनिवारी नवीन निर्बंधांची घोषणा केली. ९ जानेवारी रात्री १२ वाजल्यापासून हे निर्बंध लागू होणार आहेत. पहिल्या आणि दुसऱ्या लाटेदरम्यान लादण्यात आलेल्या कठोर निर्बंधाप्रमाणे यंदाचे निर्बंध कठोर नाहीयेत. परंतू या निर्बंधांमध्ये राज्य सरकारने आज महत्वाचा बदल केला आहे. शनिवारी जाहीर केलेल्या निर्णयात राज्य सरकारने ब्युटी पार्लर आणि जिम बंद […]
ADVERTISEMENT

कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येवर निर्बंध आणण्यासाठी राज्य सरकारने शनिवारी नवीन निर्बंधांची घोषणा केली. ९ जानेवारी रात्री १२ वाजल्यापासून हे निर्बंध लागू होणार आहेत. पहिल्या आणि दुसऱ्या लाटेदरम्यान लादण्यात आलेल्या कठोर निर्बंधाप्रमाणे यंदाचे निर्बंध कठोर नाहीयेत. परंतू या निर्बंधांमध्ये राज्य सरकारने आज महत्वाचा बदल केला आहे.
शनिवारी जाहीर केलेल्या निर्णयात राज्य सरकारने ब्युटी पार्लर आणि जिम बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. परंतू सुधारित आदेशात सरकारने ब्युटी पार्लर आणि जिम ५० टक्के क्षमतेने सुरु ठेवण्याची परवानगी दिली आहे.
या सुधारित निर्णयाप्रमाणे या सेवा घेताना मास्क काढण्याची परवानगी नसणार आहे. तसेच लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांनाच या सेवा पुरवल्या जाणार आहेत. याचसोबत सलूनमधील कर्मचाऱ्यांचे लसीचे दोन्ही डोस पूर्ण होणं गरजेचं असल्याचंही सरकारने या सुधारित आदेशांत स्पष्ट केलं आहे.
जिमही ५० टक्के क्षमतेनं सुरू राहणार आहेत. कोणताही व्यायाम करताना मास्क काढता येणार नाही. संपूर्ण लसीकरण झालेल्यांनाच जीम करण्याची परवानगी. जीममधील कर्मचाऱ्यांचं लसीकरण पूर्ण झालेलं असावं, असंही सुधारित आदेशात म्हटलं आहे.