Maharashtra Nagar Panchayat Election: मतदानाची रणधुमाळी, 105 नगरपंचायती, 2 जिल्हा परिषदांसाठी मतदान
मुंबई: राज्यातील 105 नगरपंचायती आणि 2 जिल्हा परिषदांसाठी मंगळवार (21 डिसेंबर) निवडणुका पार पडत आहे. स्थानिक स्वराज संस्थांच्या या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय (OBC Reservation) होत आहेत. एकूण 105 नगरपंचायती आणि भंडारा आणि गोंदिया जिल्हा परिषदेसाठी निवडणूक घेण्यात येत आहे. अमरावती: दोन नगरपंचायतीच्या 30 सदस्य पदासाठी मतदान अमरावती जिल्ह्यातील तिवसा व भातकुली नगरपंचायतीच्या 30 सदस्यपदाकरिता आज […]
ADVERTISEMENT

मुंबई: राज्यातील 105 नगरपंचायती आणि 2 जिल्हा परिषदांसाठी मंगळवार (21 डिसेंबर) निवडणुका पार पडत आहे. स्थानिक स्वराज संस्थांच्या या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय (OBC Reservation) होत आहेत. एकूण 105 नगरपंचायती आणि भंडारा आणि गोंदिया जिल्हा परिषदेसाठी निवडणूक घेण्यात येत आहे.
अमरावती: दोन नगरपंचायतीच्या 30 सदस्य पदासाठी मतदान
अमरावती जिल्ह्यातील तिवसा व भातकुली नगरपंचायतीच्या 30 सदस्यपदाकरिता आज मतदान होत आहे. यामध्ये 16,189 मतदार मतदानाचा हक्क बजावतील. यामध्ये तिवसा नगरपंचायतच्या 14 जागेसाठी 62 उमेदवार रिंगणात असून भातकुलीच्या 16 जागेसाठी 60 उमेदवार रिंगणात आहे.
तिवसा नगरपंचायतवर सत्ता महिला व बालकल्याण मंत्री, अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या काँग्रेस पक्षाची होती तर भातकुली नगरपंचायतवर आमदार रवी राणा व खासदार नवनीत राणा यांच्या युवा स्वाभिमान संघटनेची सत्ता होती. त्यामुळे या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.