बदलापूर : दुधाच्या डेअरीत चोरट्याने मारला डल्ला, घटना सीसीटीव्हीत कैद
डिसेंबर महिन्यात उल्हासनगर, अंबरनाथ आणि ग्रामीण भागात चोऱ्यांचं प्रमाण वाढलेलं होतं. यानंतर चोरट्यांनी आता बदलापूरला आपलं लक्ष्य केलेलं पहायला मिळतंय. ८ जानेवारीला मध्यरात्री बदलापूर पूर्व भागातील सागर डेअरीमध्ये चोरट्यांनी डल्ला मारत ६० हजारांची रक्कम लांबवली आहे. बदलापूर पूर्व भागातील शिवाजी चौकात असलेली सागर डेअरी ही स्थानिकांमध्ये प्रसिद्ध आहे. ८ जानेवारीला मध्यरात्री दुकानाचं शटर मधोमध वाकवून […]
ADVERTISEMENT

डिसेंबर महिन्यात उल्हासनगर, अंबरनाथ आणि ग्रामीण भागात चोऱ्यांचं प्रमाण वाढलेलं होतं. यानंतर चोरट्यांनी आता बदलापूरला आपलं लक्ष्य केलेलं पहायला मिळतंय. ८ जानेवारीला मध्यरात्री बदलापूर पूर्व भागातील सागर डेअरीमध्ये चोरट्यांनी डल्ला मारत ६० हजारांची रक्कम लांबवली आहे.
बदलापूर पूर्व भागातील शिवाजी चौकात असलेली सागर डेअरी ही स्थानिकांमध्ये प्रसिद्ध आहे. ८ जानेवारीला मध्यरात्री दुकानाचं शटर मधोमध वाकवून चोरट्याने आत प्रवेश केला. यानंतर दुकानाच्या गल्ल्यात ठेवलेली जवळपास ६० हजाराची रक्कम या चोरट्याने पळवली आहे.
बदलापूरच्या सागर डेअरीत चोराने मारला डल्ला pic.twitter.com/xZrWil1HlT
— Prathmesh Dixit (@PrathmeshDixit2) January 12, 2022
ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या प्रकरणी बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी चोरट्याचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. या प्रकारानंतर पोलिसांनी या भूरट्या चोरांचा ताबडतोक बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
संसार सुरळीत चालवण्यासाठी तो चोर बनला, नागपूर पोलिसांनी केली अटक