मोदींच्या सभेत मिथून चक्रवर्तींची हजेरी? भाजप प्रवेशाचे संकेत
पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी आणि तृणमूल काँग्रेसच्या गडाला सुरुंग लावण्यासाठी भाजपने जोरदार तयारी केली आहे. याचाच एक भाग म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज कोलकात्याच्या ब्रिगेड परेड मैदानावर जाहीर सभा होणार आहे. या सभेत ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेते मिथून चक्रवर्ती उपस्थित राहणार असल्याचे संकेत मिळत आहेत. भाजपचे राष्ट्रीय सचिव कैलास विजयवर्गीय यांनी चक्रवर्ती यांची त्यांच्या राहत्या […]
ADVERTISEMENT

पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी आणि तृणमूल काँग्रेसच्या गडाला सुरुंग लावण्यासाठी भाजपने जोरदार तयारी केली आहे. याचाच एक भाग म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज कोलकात्याच्या ब्रिगेड परेड मैदानावर जाहीर सभा होणार आहे. या सभेत ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेते मिथून चक्रवर्ती उपस्थित राहणार असल्याचे संकेत मिळत आहेत. भाजपचे राष्ट्रीय सचिव कैलास विजयवर्गीय यांनी चक्रवर्ती यांची त्यांच्या राहत्या घरी भेट घेतली.
या भेटीचे फोटो विजयवर्गीय यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर पोस्ट केले आहेत. त्यामुळे मिथुन चक्रवर्ती भाजपत प्रवेश करणार असल्याच्यां चर्चांना उधाण आलेलं आहे.
अभी देर रात कोलकाता के बेलगाचिया में सिनेमा जगत के माशूर अभिनेता मिथुन दाँ के साथ लम्बी चर्चा हुई ।
उनकी राष्ट्र भक्ति और ग़रीबों के प्रति प्रेम की कहानियाँ सुनकर मन गद-गद हो गया । pic.twitter.com/1REwfpZNax— Kailash Vijayvargiya (@KailashOnline) March 6, 2021
मिथून चक्रवर्ती मोदींच्या सभेत उपस्थित राहण्याची शक्यता आहे, अशी माहिती भाजप नेत्यांनी पीटीआयला दिली. आपल्या सुरुवातीच्या काळात पश्चिम बंगालमध्ये कम्युनिस्ट पक्षाशी जवळीक असलेले चक्रवर्ती तृणमूल काँग्रेसच्या तिकीटावर राज्यसभेत निवडून गेले होते. यानंतर मिथून यांनी राजकारणातून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर पश्चिम बंगालच्या रणधुमाळीत मोदींच्या सभेत हजेरी लावून मिथून चक्रवर्ती पुन्हा एकदा नवीन राजकीय प्रवासाला सुरुवात करतात का याकडे सर्वांचं लक्ष राहणार आहे.