खासदार नवनीत राणा यांना शिवसेनेच्या लेटरहेडवर जीवे मारण्याची धमकी

मुंबई तक

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा कौर यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. शिवसेनेच्या लेटरहेडवर ही धमकी नवनीत राणा यांना देण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वीच नवनीत राणा यांनी लोकसभेत शिवसेनेविरोधात भाष्य केलं होतं. आता नवनीत राणा यांना शिवसेनेच्या लेटरहेडवर जीवे मारण्याची आणि तोंडावर Acid फेकण्याची देण्यात आली आहे. या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली आहे. […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा कौर यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. शिवसेनेच्या लेटरहेडवर ही धमकी नवनीत राणा यांना देण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वीच नवनीत राणा यांनी लोकसभेत शिवसेनेविरोधात भाष्य केलं होतं. आता नवनीत राणा यांना शिवसेनेच्या लेटरहेडवर जीवे मारण्याची आणि तोंडावर Acid फेकण्याची देण्यात आली आहे. या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली आहे. याप्रकरणी नवनीत राणा यांनी 13 फेब्रुवारीला तक्रार दिली आहे. त्यांच्या घराच्या आवारात अज्ञाताने एक पत्र फेकलं जे शिवसेनेचे लेटरहेड होतं आणि त्यामध्ये नवनीत राणा यांना जीवे मारण्याची आणि तोंडावर Acid फेकण्याची धमकी देण्यात आली.

नवनीत राणा यांनी दिल्लीच्या नॉर्थ अव्हेन्यू पोलीस ठाण्यात यासंबंधीची तक्रार नोंदवली आहे. यामध्ये आरोप लावण्यात आला आहे की या परिसरात त्यांचं जे घर आहे तिथे हे पत्र फेकण्यात आलं. या पत्रामध्ये नवनीत राणा यांच्याबद्दल काही आक्षेपार्ह शब्दही वापरण्यात आले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी आयपीसीच्या कलम 506 आणि 509 अंतर्गत तक्रार दाखल केली आहे आणि या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे.

मागील काही दिवसांपासून खासदार नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरे सरकारवर टीका केली होती. शेतकऱ्यांच्या समस्या, वाढीव, वीजबिल या आणि अशा अनेक मुद्द्यांवर नवनीत राणा यांनी लोकसभेत बोलताना टीका केली होती. या पार्श्वभूमीवर आता नवनीत राणा यांना धमकीचं पत्र आलं आहे. या पत्रात नवनीत राणा यांच्या चेहऱ्यावर ऍसिड फेकण्याची धमकीही देण्यात आली आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp