Lakhimpur घटनेचा निषेध करत महाविकास आघाडी सरकारने 11 ऑक्टोबरला पुकारला महाराष्ट्र बंद
उत्तर प्रदेशातील लखीमपूर या ठिकाणी घडलेल्या घटनेचा निषेध म्हणून 11 ऑक्टोबरला महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्र बंदची घोषणा केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ही माहिती दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेस हे तिन्ही पक्ष या बंदमध्ये सहभागी होतील असंही जयंत पाटील यांनी सांगितलं आहे. काय आहे प्रकरण? उत्तर प्रदेशचे उप-मुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य […]
ADVERTISEMENT

उत्तर प्रदेशातील लखीमपूर या ठिकाणी घडलेल्या घटनेचा निषेध म्हणून 11 ऑक्टोबरला महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्र बंदची घोषणा केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ही माहिती दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेस हे तिन्ही पक्ष या बंदमध्ये सहभागी होतील असंही जयंत पाटील यांनी सांगितलं आहे.
काय आहे प्रकरण?
उत्तर प्रदेशचे उप-मुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य यांच्या स्वागतासाठी केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष उर्फ मोनू गेला होता. यावेळी आशिषच्या ताफ्यात असलेल्या गाड्या आणि आंदोलनकर्ते शेतकरी समोरासमोर आले. ज्यानंतर मोनूच्या ताफ्यातील गाडीने शेतकऱ्यांवर गाडी चढवल्याचा आरोप झाला आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या प्रकरणी स्पष्टीकरण देत लखीमपूरमधली घटना दुर्दैवी आहे आणि दोषींवर कारवाई करण्यात येईल असं आश्वासन दिलं आहे.
नेमकं घडलं तरी काय?