LIC एजंटच्या घरावर पोलिसांचा छापा, कोट्यवधी रुपये केले जप्त

LIC एजंटच्या घरावर पोलिसांचा छापा, कोट्यवधी रुपये केले जप्त
police raid dhule lic agent house seize crores of rupees

धुळे: धुळे शहरातील LIC वीमा एजेंट राजेंद्र बंब याच्या घरावर पोलिसांनी अचानक छापा टाकला. धक्कादायक बाब म्हणजे छापा टाकल्यानंतर राजेंद्र बंब याच्याकडून तब्बल दोन दिवसात पाच कोटीचीं मालमत्ता पोलिसांनी जप्त केली आहे. प्रथम कारवाईत 1 कोटी 42 लाखांची रोकड जप्त करण्यात आली आहे. तसेच 46 लाखांचे दागिनेही जप्त करण्यात आले आहेत.

दुसऱ्या कारवाईत बँक व योगेश्वरी पतसंस्थेतील लॉकर मधून 2 कोटी 54 लाख 88 हजार रुपये व 19 लाख 5 हजार रुपये किमतीचे सोने पोलिसांनी जप्त केले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, अजून मोठे घबाड हाती लागण्याची शक्यता आहे.

राजेंद्र बंब यांच्यावर कोणता गुन्हा?

राजेंद्र बंब याच्याकडे जयेश दुसाने नावाचा व्यक्ती कामाला होता. आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे जयेशने बंब याच्याकडून त्याने दोन वेळा व्याजाने पैसे घेतले होते. मात्र, राजेंद्र बंब याना पैशाच्या मोबदल्यात वडिलोपार्जित संपत्तीचे कागदपत्रे जयेशने दिले होते. पण व्याजासहीत पैशांची परतफेड केल्यानंतरही बंब यांनी जयेश याच्या संपत्तीचे कागदपत्रे परत केले नाही. त्यामुळे जयेश दुसाने यांनी बंब याच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली.

जयेश दुसाने यांची पोलिसांकडे धाव:

संपत्तीचे कागदपत्र परत घेण्यासाठी जयेश दुसाने यांनी पोलिसात धाव घेतली होती. पोलीस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील यांच्याकडे तक्रार दाखल केल्यानंतर लगेच याप्रकरणी कारवाई करण्यात आली. पोलीस अधीक्षकांनी गुन्हे शाखेला रीतसर सूचना देत गुन्हा दाखल करत कारवाईचे आदेश देण्यात आले.

बनावट फायनान्स कंपनी

जीपी फायनान्स कंपनी ही बनावट फायनान्स कंपनी स्थापन करुन बंब हा लोकांना व्याजाने पैसे देत होता. 24 ते 36 टक्के व्याजाचे दर लावत पठाणी वसुली बंबकडून सुरू होती. अशी प्राथमीक माहिती आता समोर आली आहे.

police raid dhule lic agent house seize crores of rupees
देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात खटला दाखल करणारे वकील सतीश उकेंच्या घरी ईडीचा छापा

गुन्हा दाखल झाल्यानंतर 5 मिनिटात कारवाई:

गुन्हा दाखल होताच 5 मिनिटात बंब याच्या आस्थापनांवर कारवाई करण्यात आली. बुधवारी सकाळी 10 वाजेच्या सुमारास सुरु झालेली झडती रात्री उशिरापर्यंत सुरु होती. त्यानंतर रात्रीच बंब यांना पोलिसांनी अटक केली.

कोट्यवधी रुपयेसह मालमत्तेचे कागदपत्रही पोलिसांना सापडले आहेत. 38 कोरे धनादेश, 104 खरेदी खत, 13 सौदा पावत्या, 33 कोरे मुद्रांक आणि 204 मुदत ठेवीच्या पावत्या सापडल्याचे पोलीस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील यांनी स्पष्ट केले आहे. पोलिसांना दिलेल्या तक्रारीत, बँक लॉकर सील करण्याच्या सूचना बँकेच्या शाखांना देण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक यांनी दिली आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in