‘संजय राऊत हे शरद पवारांचेच, ते शिवसैनिक नाहीत’; रामदास कदमांचे उद्धव ठाकरेंवरही टीकेचे बाण
संजय राऊतांच्या घरी ईडीची चौकशी आणि झाडाझडती सुरू असतानाच शिंदे गटातील नेते रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे, शरद आणि संजय राऊतांवर निशाणा साधला. मी अभ्यास करून बोलतोय आणि माझा दावा आहे की, संजय राऊत हे शरद पवारांचेच आहेत, ते शिवसैनिक नाहीत,’ असं रामदास कदम यांनी म्हटलं आहे. रामदास कदम यांनी माध्यमांशी संवाद साधला. गद्दार शब्दावरून […]
ADVERTISEMENT

संजय राऊतांच्या घरी ईडीची चौकशी आणि झाडाझडती सुरू असतानाच शिंदे गटातील नेते रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे, शरद आणि संजय राऊतांवर निशाणा साधला. मी अभ्यास करून बोलतोय आणि माझा दावा आहे की, संजय राऊत हे शरद पवारांचेच आहेत, ते शिवसैनिक नाहीत,’ असं रामदास कदम यांनी म्हटलं आहे.
रामदास कदम यांनी माध्यमांशी संवाद साधला. गद्दार शब्दावरून कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर नाव न घेता टीका केली. “महाराष्ट्रात जे काही चाललंय. सगळं गढूळ झालंय. त्याच्यामागे कोण आहे. उद्धवजींच्या आसपासचे बडवे कोण आहेत. कधीतरी याचा विचार होणार आहे की, नाही. ५२ वर्ष काम केलेल्या रामदास कदमला आज बाजूला व्हावं लागतंय. मग रामदास कदम गद्दार आहे की, तुमच्या आजूबाजूचे लोक गद्दार आहेत? गद्दाराची नेमकी व्याख्या काय आहे?,” असा सवाल रामदास कदम यांनी उपस्थित केला.
संजय राऊतांबद्दल रामदास कदम काय म्हणाले?
“६४ पैकी ५१ आमदार जातात. शिल्लक राहिलेले प्रामाणिक आणि बाकीचे गद्दार. गद्दारची व्याख्या काय आहे. का घडलं हे. याच्या मुळापर्यंत जाणार की नाही. अभ्यास करणार की नाही. पक्ष वाचवणार की नाही. बाळासाहेबांचे विचार वाचवणार आहेत की, नाही. आपल्याला शरद पवारांचे विचार घेऊन पुढे जायचं का? माझा दावा आहे की, संजय राऊत हे शरद पवारांचेच आहेत. ते शिवसैनिक नाहीत. मी हे प्रचंड अभ्यासाने बोलतोय,” असं रामदास कदम म्हणाले.
Patra Chawl land scam case : मरेन पण शरण जाणार नाही, शिवसेना सोडणार नाही -संजय राऊत