अत्तर व्यापारी पियूष जैनच्या घरात 257 कोटी, 20 किलोहून जास्त सोनं जाणून घ्या काय काय हाती लागलं?
कानपूरचे अत्तर व्यापारी पियूष जैन यांच्या घरात सापडलेली संपत्ती पाहून कोणाचेही डोळे दीपतील. कारण त्यांच्या घरात सापडलेल्या नोटा थोड्या थोडक्या नाही 257 कोटी रूपये आयकर विभागाला आढळले आहेत. कानपूर, कनौज या ठिकाणी छापेमारी केल्यानंतर आयटी विभागाला आत्तापर्यंत 280 कोटींची संपत्ती मिळाली आहे. पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार कानपूर जीएसटीचे संयुक्त आयुक्त सुरेंद्र कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार पियूष […]
ADVERTISEMENT

कानपूरचे अत्तर व्यापारी पियूष जैन यांच्या घरात सापडलेली संपत्ती पाहून कोणाचेही डोळे दीपतील. कारण त्यांच्या घरात सापडलेल्या नोटा थोड्या थोडक्या नाही 257 कोटी रूपये आयकर विभागाला आढळले आहेत. कानपूर, कनौज या ठिकाणी छापेमारी केल्यानंतर आयटी विभागाला आत्तापर्यंत 280 कोटींची संपत्ती मिळाली आहे.
पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार कानपूर जीएसटीचे संयुक्त आयुक्त सुरेंद्र कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार पियूष जैनला कर चोरी प्रकरणात अटक करण्यात आली आहे. पुढच्या कारवाईसाठी त्याला कानपूरहून अहमदाबादला नेलं जाऊ शकतं.
महत्त्वाचा मुद्दा