ओवेसींवर तुफान टीका, भाजपला देखील सुनावलं; शिवसेना पुन्हा आक्रमक
मुंबई: शिवसेनेने आपलं मुखपत्र ‘सामना’तून एमआयएम आणि भाजप या दोन्ही पक्षांचा चांगलाच समाचार घेतला आहे. सामनाच्या अग्रलेखातून शिवसेनेने एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. ‘ओवेसी यांच्याकडे भाजपसारख्या राष्ट्रीय पक्षांचे अंगवस्त्र म्हणून पाहिले जाईल.’ अशा शब्दात शिवसेनेने त्यांच्यावर टीका केली आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा शिवसेना आणि एमआयएम यांच्यात जुंपण्याची शक्यता आहे. दुसरीकडे […]
ADVERTISEMENT

मुंबई: शिवसेनेने आपलं मुखपत्र ‘सामना’तून एमआयएम आणि भाजप या दोन्ही पक्षांचा चांगलाच समाचार घेतला आहे. सामनाच्या अग्रलेखातून शिवसेनेने एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. ‘ओवेसी यांच्याकडे भाजपसारख्या राष्ट्रीय पक्षांचे अंगवस्त्र म्हणून पाहिले जाईल.’ अशा शब्दात शिवसेनेने त्यांच्यावर टीका केली आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा शिवसेना आणि एमआयएम यांच्यात जुंपण्याची शक्यता आहे.
दुसरीकडे याच अग्रलेखात भारतीय जनता पक्षाच्या राजकारणावर देखील शिवसेनेने बोचरी टीका केली आहे. ‘पाकिस्तानचा वापर केल्याशिवाय भाजपचे राजकारण पुढे सरकणार नाही का?’ असा सवालही यावेळी करण्यात आला आहे. जाणून घेऊयात अग्रलेखात नेमकं काय-काय म्हटलं आहे.
‘सामना’च्या अग्रलेखातील महत्त्वाचे मुद्दे
-
ओवेसी हे राष्ट्रभक्तच आहेत. बॅ. जिना यांच्याप्रमाणे ते उच्चशिक्षित, कायदेपंडित आहेत, पण त्याच जिना यांनी राष्ट्रभक्तीचा बुरखा पांघरून ‘पाकिस्तान झिंदाबाद’चा नारा दिला. देशाची फाळणी हा कट होता व त्यामागे ब्रिटिशांची फोडा-झोडा व राज्य करा हीच नीती होती.