Amravati : आंबे तोडणं पडलं महागात; लोखंडी रॉड शरीराच्या आरपार
Amravati News : अमरावती : आंबे तोडायला झाडावर चढणं एक १४ वर्षीय मुलाला चांगलचं महागात पडलं आहे. आंबे तोडताना झाडावरुन तोल सुटून खाली पडल्याने संबंधित मुलाच्या शरीरातून २ फूट लोखंडी अँगल आरपार गेला. अमरावतीमध्ये (Amravati) हा धक्कादायक प्रकार घडला आहे. यश दुर्योधन असं या मुलाचं नावं आहे. उपस्थितांनी यशला तात्काळ उपचारासाठी दाखल करुन त्याचा जीव […]
ADVERTISEMENT

Amravati News :
अमरावती : आंबे तोडायला झाडावर चढणं एक १४ वर्षीय मुलाला चांगलचं महागात पडलं आहे. आंबे तोडताना झाडावरुन तोल सुटून खाली पडल्याने संबंधित मुलाच्या शरीरातून २ फूट लोखंडी अँगल आरपार गेला. अमरावतीमध्ये (Amravati) हा धक्कादायक प्रकार घडला आहे. यश दुर्योधन असं या मुलाचं नावं आहे. उपस्थितांनी यशला तात्काळ उपचारासाठी दाखल करुन त्याचा जीव वाचविला. (A shocking incident happened with a boy who climbed a tree to cut mangoes in Amravati)
नेमका काय प्रकार घडला?
अमरावतीच्या राजापेठ भागातील गोपाळ नगरमध्ये ‘यश दुर्योधन’ हा मुलगा आंबे तोडण्यासाठी झाडावर चढला होता. यावेळी अचानक त्याचा तोल सुटून तो खाली पडला. जिथून तो पडला तिथे एका लोखंडी अँगलला वायरचे कंपाऊंड होते, त्याच लोखंडी अँगलवर तो पडला. यावेळी त्याच्या उजव्या हातातून अडीच फुटाचा लोखंडी अँगल आरपार गेला.
Thane Crime: CM एकनाथ शिंदेंच्या ठाण्यात शिवसेनेच्या नेत्याची हत्या