रणवीर सिंगच्या फोटोशूटवर अबू आझमींचा आक्षेप; न्यूड फोटो शेअर करण्याचं स्वातंत्र्य, मग हिजाब…
सपा नेते अबू आझमी (Abu Azami) यांनी बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंगच्या न्यूड फोटोशूटवर (Ranveer Singh Nude Photoshoot) प्रश्न उपस्थित केला आहे. त्यांनी ट्विट करत प्रश्न उपस्थित केला आहे की, न्यूड फोटो सार्वजनिक करणे हे स्वातंत्र्य आहे, मग हिजाब घालायला का नाही? अबू आझमी आपल्या ट्विटमध्ये म्हणाले “उघड्या शरीराचे प्रदर्शन करणे याला कला आणि स्वातंत्र्य म्हणतात, […]
ADVERTISEMENT
सपा नेते अबू आझमी (Abu Azami) यांनी बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंगच्या न्यूड फोटोशूटवर (Ranveer Singh Nude Photoshoot) प्रश्न उपस्थित केला आहे. त्यांनी ट्विट करत प्रश्न उपस्थित केला आहे की, न्यूड फोटो सार्वजनिक करणे हे स्वातंत्र्य आहे, मग हिजाब घालायला का नाही? अबू आझमी आपल्या ट्विटमध्ये म्हणाले “उघड्या शरीराचे प्रदर्शन करणे याला कला आणि स्वातंत्र्य म्हणतात, तर दुसरीकडे संस्कृतीनुसार, जर एखाद्या मुलीला स्वत:च्या इच्छेनुसार हिजाबने तिचे शरीर झाकायचे असेल, तर त्याला छळ आणि धार्मिक भेदभाव म्हणतात. नक्की आपल्याला कसा समाज हवा आहे ?”
ADVERTISEMENT
अबू आझमींनी ट्विटसोबत शेअर केले रणवीर सिंगचे फोटो विचारला प्रश्न
सपा नेते आझमी यांनी या ट्विटसोबत फोटो शेअर केले आहेत. त्यात असे लिहिले आहे की, ‘जर नग्न फोटो सार्वजनिक करण्याचे स्वातंत्र्य असेल, तर शाळा, कॉलेज आणि सर्वच ठिकाणी मुलींना हवा तसा स्कार्फ/हिजाब/बुरखा घालण्याचे स्वातंत्र्य का नाही? या ट्विटमध्ये त्यांनी #RanveerSingh चा देखील वापर केला आहे.
नंगे जिस्म की नुमाइश करना आर्ट व आज़ादी कहलाता है तो एक तरफ संस्कृति के मुताबिक लड़की अपनी मर्ज़ी से बदन को हिजाब से ढकना चाहे तो वह उत्पीड़न व धार्मिक भेदभाव कहलाता है।
हमें आखिर कैसा समाज चाहिए?
नंगी तस्वीरें सार्वजनिक करना आज़ादी है तो हिजाब पहनना क्यों नहीं?#RanveerSingh pic.twitter.com/PSyTrI9Y2L
— Abu Asim Azmi (@abuasimazmi) July 22, 2022
मिमी चक्रवर्तींनीही घेतला आक्षेप
अभिनेत्री आणि राजकारणी मिमी चक्रवर्ती यांनीही रणवीर सिंगच्या फोटोशूटवरती प्रश्न उपस्थित केला होता. एखाद्या महिलेने असेच फोटो काढले असते, तर सोशल मीडियावर आणि लोकांच्या अशाच प्रतिक्रिया आल्या असत्या का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. कदाचित आपल्याला जीवे मारण्याची धमकी दिली गेली असती, असे त्यांनी लिहिले आहे.
हे वाचलं का?
मिमी यांनी ट्विट केले की, “रणवीर सिंगच्या नव्या फोटोशूटने इंटरनेटवर खळबळ उडवून दिली आहे. आश्चर्य वाटते की ती स्त्री असते तर तिला असेच कौतुक मिळाले असते का? कदाचीत तुम्ही तिचे घर जाळून टाकाल, मोर्चा काढाल, जीवे मारण्याची धमकी द्याल.
या कलाकारांनी देखील केले ‘न्यूड फोटोशूट’
आजकाल लायगर या चित्रपटामुळे न्यूड फोटोशूट चर्चेत आहे. अभिनेता विजय देवकोंडा याचे नाव देखील यामध्ये सामिल आहे. काही वेळापूर्वी सोशल मीडियावर विजयचे एक पोस्टर समोर आले होते, ज्यामध्ये तो नग्न अवस्थेत दिसत आहे. बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट अभिनेता आमिर खाननेही असेच केले आहे. असेच एक पोस्टर आमिरच्या पीके चित्रपटातून समोर आले होते, ज्यामध्ये तो फक्त रेडिओसोबत नग्न अवस्थेत दिसत होता. सुपरमॉडेल म्हटल्या जाणाऱ्या मिलिंद सोमणनेही फोटोशूटसाठी कपडे उतरवले होते.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT