Ajit Pawar : "मला हलक्यात घेऊ नका..." या शिंदेंच्या वक्तव्यावर दादांची प्रतिक्रिया, एकच हशा पिकला
Ajit Pawar on Eknath Sindhe: एका कार्यक्रमादरम्यान शिंदे म्हणाले होते, 'मला हलक्यात घेऊ नका'. त्यामुळे हा इशारा नेमका विरोधकांना आहे की, सोबतच्याच प्रतिस्पर्धी पक्षांना अशी चर्चा सुरू झाली होती. तसंच गेल्या काही दिवसांपासून, राज्याच्या राजकीय वर्तुळात अशीही चर्चा आहे की, राज्यातील महायुती सरकारमध्ये धुसफूस सुरू आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

एकनाथ शिंदे म्हणाले, मला हलक्यात घेऊ नका...

अजितदादा म्हणाले, शिंदे कुणाला बोलले तेच कळलं नाही

महायुतीत धुसफूस? नेत्यांच्या वक्तव्यांचा अर्थ काय?
Maharashtra Politics: 'मला हलक्यात घेऊ नका' असं विधान एकनाथ शिंदे यांनी केलं होतं. यावर अजित पवार यांनी आता प्रतिक्रिया दिली असून, त्यांच्या वक्तव्यानं मात्र चांगलाच हशा पिकला होता. 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात, अजित पवार यांनी स्वतः प्रश्न केला की, या विधानातून एकनाथ शिंदे हे नक्की मशालीकडेच बोट दाखवत आहेत की दुसऱ्या कोणाकडे? त्यामुळे महायुतीमध्ये सुरू असलेली धुसफूस ही फक्त चर्चा नसल्याचं आता बोललं जातंय.
तालकटोरा स्टेडियममध्ये शिंदे यांच्या उपस्थितीत सुरू असलेल्या कार्यक्रमात अजित पवार म्हणाले की, अलीकडेच एकनाथजींनी 'मला हलक्यात घेऊ नका' असं वक्तव्य केलं होतं. तसंच, त्यांच्या निशाण्यावर कोण होतं, हे स्पष्ट झालं नाही. त्यानंतर अजित पवारांच्या भाषणानंतर एकनाथ शिंदे यावर बोलणार का यावर सर्वांचं लक्ष होतं, पण त्यांनी त्यावर बोलणं टाळलं.
हे ही वाचा >> Jitendra Awhad : "मंत्रिमंडळात मुख्यमंत्र्यांच्या मांडीला मांडी लावून...", माणिकराव कोकाटेंवर हल्लाबोल करत आव्हाड काय म्हणाले?
पीटीआयच्या वृत्तानुसार, एका कार्यक्रमादरम्यान शिंदे म्हणाले होते, 'मला हलक्यात घेऊ नका'. त्यामुळे हा इशारा नेमका विरोधकांना आहे की, सोबतच्याच प्रतिस्पर्धी पक्षांना अशी चर्चा सुरू झाली होती. त्यामुळे यावर बोलताना अजित पवार म्हणाले की, महायुती युतीमध्ये कोणताही दुरावा नाही.
दरम्यान, या कार्यक्रमात बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळातच मराठीला 'अभिजात भाषेचा' दर्जा देण्यात आला. राजकारणाच्या पलीकडे जाऊन संबंध राखले पाहिजेत हे सांगताना एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांच्यात कशी सौहार्दपूर्ण भेट झाली याचं उदाहरण दिलं.