अमरावती हिंसाचार प्रकरण : भाजपा नेते प्रवीण पोटेंसह दहा जण शरण; पोलिसांनी केली अटक

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

अमरावती शहरात झालेल्या हिंसाचार प्रकरणी पोलिसांनी संशयितांची धरपकड सुरूच आहे. गेल्या तीन-चार दिवसांपासून पोलीस हिंसाचारात सहभागी असलेल्या आरोपींचा शोध घेत असून, यात भाजपाच्या काही नेते आणि कार्यकर्त्यांचाही समावेश आहे. भाजपाचे नेते आणि माजी पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्यासह काही कार्यकर्ते गायब होते. अखेर हे पोटे यांच्यासह दहा कार्यकर्त्यांनी आत्मसमर्पण केलं.

ADVERTISEMENT

त्रिपुरातील तथाकथित हिंसाचाराचे महाराष्ट्रातील काही शहरातही पडसाद उमटले होते. राज्यातील नांदेड, मालेगाव, अमरावती यांसह वेगवेगळ्या शहरात या तथाकथित हिंसाचाराच्या विरोधात बंद पाळत निदर्शनं करण्यात आली होती. मात्र, अमरावती, मालेगाव आणि नांदेडात या बंदला हिंसक वळण मिळालं होतं. महत्त्वाचं म्हणजे अमरावतीत सलग दोन दिवस हिंसाचार उसळला होता.

Amravati: भाजपचे माजी मंत्री अनिल बोंडे म्हणतात, अमरावतीत हिंसाचार भडकला कारण…

हे वाचलं का?

याप्रकरणी पोलिसांनी तब्बल तीन हजार लोकांवर गुन्हे दाखल केलेले असून, फरार असलेले भाजपाचे नेते प्रवीण पोटे यांच्यासह दहा कार्यकर्त्यांनी आज आत्मसमर्पण केलं आहे. शुक्रवारी झालेल्या हिंसक घटनेच्या निषेधार्थ भाजपासह काही हिंदू संघटनांनी शनिवारी बंदची हाक दिली होती. याचवेळी पुन्हा एकदा हिंसेचा भडका उडाला होता.

अमरावती हिंसाचार प्रकरणी धरपकड; 100 हून अधिक जणांना अटक, संचारबंदी अंशतः शिथिल

ADVERTISEMENT

या हिंसाचारामध्ये आरोपी असलेले माजी पालकमंत्री प्रवीण पोटे यांना कोतवाली पोलिसांनी अटक केली. त्याच्याबरोबर 10 कार्यकर्त्यांनाही अटक झाली असून, या प्रकरणात पोलिसांनी कलम 270 (जीवितास धोका), कलम 505, 153 (एखाद्या धर्माबद्दल/समाजाबद्दल आक्षेपार्ह बोलणे), महाराष्ट्र पोलीस अॅक्ट 135, त्याचबरोबर क्रिमिनल ऍक्ट कलम 3,7 अशा विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेले असून, पोटेंसह व दहा कार्यकर्त्यांना न्यायालयात हजर केले जाणार आहे. कोतवाली पोलीस स्टेशनच्या अधिकारी नीलिमा आरज यांनी ही माहिती दिली.

ADVERTISEMENT

निर्जन रस्ते, भयाण शांतता…पाहा दंगलीनंतरच अमरावती शहर

या हिंसाचार प्रकरणात पोलिसांनी राज्याचे माजी कृषी मंत्री तथा भाजपाचे नेते अनिल बोंडे, नगरसेवक तुषार भारतीय यांनाही अटक केली होती. दोघांनाही न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. अमरावती शहरासह जिल्ह्यातील परिस्थिती पूर्वपदावर येत असून, प्रशासनाकडून संचारबंदीतून किंचित दिलासा दिला आहे. त्यामुळे नागरिकांना ठराविक वेळेत जीवनावश्यक वस्तूंसाठी बाहेर पडता येत आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT