नऊ तास Tauktae वादळाशी झुंज देऊन सातारचा पठ्ठ्या सुखरुप घरी

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

तौकताई चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात कोकण किनारपट्टी आणि मुंबईला चांगलाच फटका बसला. त्यातच अरबी समुद्रात बार्ज P 305 हे जहाज बुडाल्यामुळे काही खलाशांना आपले प्राण गमवावे लागले. परंतू सातारचा अनिल वायचळ ९ तास अस्मानी संकटाचा सामना करत सुखरुप घरी पोहचला आहे.

लाईफ जॅकेटच्या सहाय्याने ९ तास समुद्रात वादळाची झुंद देणाऱ्या अनिल वायचळ यांची नौदलाने सुटका केली आणि तीन दिवस अनिलची वाट पाहणाऱ्या त्याच्या घरच्यांच्या जीवात जीव आला. घरी परतल्यावर अनिलच्या घरच्यांनी औक्षण करुन त्याचं स्वागत केलं. अनिल वायचळ हे मुंबईत अँफकॉन इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनीत कार्यरत आहेत.अरबी समुद्रातील ओएनजीसीच्या प्लॅन्टवर या कंपनीचे काम सुरू असल्याने वादळावेळी सहकाऱ्यां समवेत ते तिकडे ड्युटीवर कार्यरत होते.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

Afcons इन्फ्रास्ट्रक्चरने सांगितलं P 305 बार्जचा अपघात नेमका कसा झाला?

काम करत असताना बार्ज जहाजावरील कर्मचाऱ्यांना चक्रीवादळाचा संदेश आला होता. परंतू आपलं जहाज मजबूत असल्यामुळे परिस्थिती हाताबाहेर जाईल असं कोणाला वाटलं नाही. १७ तारखेला अनिल यांनी आपल्या मोबाईलवरुन घरच्यांना मेसेज केला आणि यानंतर त्यांचा संपर्कच तुटला. परंतू ज्यावेळी समुद्रात वादळामुळे उंच लाटा तयार व्हायला लागल्या त्यावेळी बार्ज जहाजालाही त्याचा फटका बसला. जहाज बुडतंय असं लक्षात येताच सर्व कर्मचाऱ्यांना लाईफ जॅकेटसह पाण्यात उड्या मारण्याच्या सूचना देण्यात आल्या.

ADVERTISEMENT

ज्यानंतर अनिल आणि काही सहकाऱ्यांनी जॅकेट घालून पाण्यात उडी मारली. यावेळी जहाजावर कर्मचाऱ्यांमध्ये चांगलीच धांदल उडाली होती. काही कर्मचारी या धांदलीत भरकटले तर काहींनी एकमेकांचा हात हातात धरत पाण्यावर तरंगत राहिले. अखेरीस ९ तासांच्या अथक प्रयत्नानंतर नौदलाच्या जवानांनी अनिलसह अन्य कर्मचाऱ्यांना वाचवलं. बुधवारी संध्याकाळी सहा वाजता अनिल नवी मुंबईतील घणसोली इथल्या घरी पोहचल्यानंतर सर्व नातेवाईकांचा जीव भांड्यात पडला.

ADVERTISEMENT

बार्ज P 305 Accident : कंपनीला कामावर असणाऱ्या लोकांच्या जिवाची किंमत नाही, बेपत्ता कर्मचाऱ्याच्या भावाचा आरोप

    follow whatsapp

    ADVERTISEMENT