बागेश्वर बाबांच्या कार्यक्रमात चोरांचा सुळसुळाट, लाखोंचे दागिने लंपास

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

bageshwar dham sarkar jewellery stolen : बागेश्वर धाम म्हणून प्रसिद्द असलेले धीरेंद्र कृष्ण शास्त्री (dhirendra krishna shastri) यांच्या कार्यक्रमांत चोरांनी हातसफाई केल्याची घटना समोर आली आहे. गर्दीचा फायदा उचलून अनेक चोरट्यांनी महिलेच्या दागिन्यावर (jewellery stolen) हात साफ केला होता. या कार्यक्रमात साधारण 4 लाख 87 हजार रूपयांचे दागिने चोरीला गेल्याची माहिती समोर आली आहे. एकीकडे भक्तांचा एक वर्ग कार्यक्रमाच्या दिशेने जात असताना दुसरीकडे दुसरा वर्ग पोलीस स्टेशनच्या दिशेने धाव घेत होता. या कार्यक्रमानंतर पोलीस ठाण्यात अनेक तक्रारी दाखल झाल्या आहेत. (bageshwar dham sarkar jewellery stolen in dhirendra krishna shastri darbar)

ADVERTISEMENT

मुंबईच्या मिरा रोड परिसरात शनिवारी धीरेंद्र कृष्ण शास्त्री (dhirendra krishna shastri) यांच्या दोन दिवस कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला खुप विरोध झाला होता. मात्र शेवटच्या क्षणी त्यांना या कार्यक्रमासाठी परवानगी देण्यात आली होती. या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात महिला आणि पुरुषांनी हजेरी लावली होती. यावेळी भक्तांच्या या गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी मोठी हातसफाई केली होती. त्यामुळे चोरीच्या अनेक तक्रारी आता मीरा रोड पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.

Crime : नवऱ्याला सोडून दिरासोबत थाटला संसार; रेल्वे स्टेशनवर सापडाला मृतदेह

हे वाचलं का?

महिलांच्या दागिन्यावर डल्ला

या कार्यक्रमात हजर झालेल्या अनके महिलांचे दागिने चोरीला गेले होते. अनेक महिला या कार्यक्रमात सोन्याची मंगलसुत्र आणि चैन घालून आल्या होत्या. यावेळी भक्तांच्या या गर्दीत चोरट्यांनी हातसफाई करत महिलांच्या गळ्यातले दागिने लांबवे होते.आतापर्यंत 36 महिलांनी या कार्यक्रमात दागिने चोरीला गेल्याची तक्रार दाखल केली होती. या तक्रारीचा आकडाही वाढवण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

19 वर्षाच्या मुलीने केलेला 15 वर्षाच्या मुलावर बलात्कार, कोर्टाने सुनावली ‘ही’ शिक्षा

ADVERTISEMENT

4 लाखांचे दागिने चोरीला

दरम्यान या कार्यक्रमात 4 लाख 87 हजार रूपयांचे सोन्याचे दागिने चोरीला गेल्याची माहिती पोलिसांनी दिली होती. महिलांनी दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली आहे. तसेच या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

ADVERTISEMENT

पालघरमध्ये ज्या साधुंसोबत जी निर्दयी घटना घडली, ती पुन्हा होऊ नये. तांत्रिकांमुळे कोणाचे घर बर्बाद होऊ नये. बागेश्वर धामचा दरबार यासाठीच लागतो आणि लागत राहेल असे वक्तव्य धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी केले होते.

ड्रायक्लिनचा बहाणा..,तरूणीचे 6 मुलाच्या बापासोबत पळून लग्न

दरम्यान 36 महिलांच्या तक्रारी या निव्वळ एका दिवसाच्या कार्यक्रमातील तक्रारी आहेत. या कार्यक्रमाचा आणखीण एक दिवस बाकी आहे. त्यामुळे हा आकडा वाढण्याची शक्यता आहे. आता या प्रकरणातील आरोपीला पोलीस ताब्यात घेतात का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT