‘पवारांचं २०२४ ला विसर्जन करायचं’; सुप्रिया सुळेंना वरमाय म्हणत गोपीचंद पडळकरांचं टीकास्त्र
भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यावर टीकेचे बाण डागले. २०२४ ला पवारांचं विसर्जन करायचं आहे. हे फार अवघड नाही. त्याची सुरूवात करण्यासाठी चंद्रशेखर बावनकुळे हे बारामतीत आले आहेत, असं विधान पडळकर यांनी केलं. शरद पवारांचा बालेकिल्ला मानला जाणाऱ्या बारामती मतदारसंघ ताब्यात घेण्यासाठी भाजपनं रणनीती आखली आहे. भाजपनं बारामती पिंजून काढण्यास […]
ADVERTISEMENT
भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यावर टीकेचे बाण डागले. २०२४ ला पवारांचं विसर्जन करायचं आहे. हे फार अवघड नाही. त्याची सुरूवात करण्यासाठी चंद्रशेखर बावनकुळे हे बारामतीत आले आहेत, असं विधान पडळकर यांनी केलं.
ADVERTISEMENT
शरद पवारांचा बालेकिल्ला मानला जाणाऱ्या बारामती मतदारसंघ ताब्यात घेण्यासाठी भाजपनं रणनीती आखली आहे. भाजपनं बारामती पिंजून काढण्यास सुरूवात केली असून, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या दौऱ्यापूर्वी भाजपचे प्रदेशाध्यक्ष गोपीचंद पडळकर आज बारामती मतदारसंघाच्या दौऱ्यावर आहेत.
चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात बोलताना आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यावर टीकास्त्र डागलं.
हे वाचलं का?
लोकसभा निवडणूक २०२४ : पवारांचं विसर्जन करायचं आहे -गोपीचंद पडळकर
गोपीचंद पडळकर म्हणाले, ‘गणपतीची स्थापना होऊन सातवा दिवस आहे. आज आपण गणपतीचं विसर्जन करणार आहोत. गणपती पुढच्या वर्षी परत येत असतो. २०२४ पवारांचं विसर्जन करण्यासाठी राज्याचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे त्याची सुरुवात करायला बारामतीत आले आहेत.’
‘भाजप शिवसेनेला राज्यातील जनतेनं कौल दिला होता. पण एखाद्याचं लुबाडून घ्यायचं. एखाद्याचं हिसकावून घ्यायचं, यात बारामतीकरांना फार आनंद असतो. इथल्या लोकसभेच्या खासदार सुप्रिया सुळे या राज्यात विश्वासघातानं सरकार आलं. त्यानंतर पहिल्या अधिवेशनात सुप्रिया सुळे या वरमाई सारख्या धावपळ करत होत्या. जनतेनं सरकार निवडून दिल्यासारखं स्वागत करत होत्या’, अशी टीका पडळकर यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर केली.
ADVERTISEMENT
‘लोकसभा प्रवास योजना जाहीर केली. निर्मला सीतारामन यांच्यावर बारामतीची जबाबदारी दिली. निर्मला सीतारामन या बिनटाक्यांचं ऑपरेशन करणाऱ्या डॉक्टर आहेत. एकदा त्या बारामतीला आल्या, तर ऑपरेशन कसं झालं हे पवारांनाही कळणार नाही’, असं म्हणत पडळकर यांनी पवारांवर निशाणा साधला.
ADVERTISEMENT
‘निर्मला सीतारामन यांचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर सुप्रिया सुळेंची विधानं बघा. त्या सातत्यानं महाराष्ट्र सरकारवर बोलत आहेत. आता तुम्ही अजिबात काळजी करू नका. तुम्ही ५० वर्ष भरपूर सेवा केली. आता तुम्ही आराम करा. जनता तुम्हाला सक्तीच्या रजेवर २०२४ मध्ये पाठवेल’, असा दावा पडळकर यांनी यावेळी केला.
लोकसभा निवडणूक २०२४ : ‘पश्चिम महाराष्ट्रातील पाच मतदारसंघ पिंजून काढणार’
‘देशातील १४४ लोकसभा मतदारसंघ भाजपनं पिंजून काढायचं ठरवलं आहे. त्यात महाराष्ट्रातील १६ लोकसभा मतदारसंघ आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील शिरूर, बारामती, सातारा, हातकंणगले आणि कोल्हापूर हे पाच मतदारसंघ आहेत. त्यासाठी निर्मला सीतारामन आपल्याकडे येणार आहेत’, असं गोपीचंद पडळकर म्हणाले.
बारामती पवारांचा बालेकिल्ला नाही, टेकडी; गोपीचंद पडळकरांची टीका
“बारामतीमध्ये परिवर्तन करण्याची वेळ आली आहे. परिवर्तन होणार आहे. हे काही फार अवघड काम नाहीये. किल्ला, बालेकिल्ला काही नाही, ही पवारांची टेकडी आहे. हे खूप मोठे असल्याचं वातावरण राज्यात तयार केलं गेलं. हे काही मोठे नाहीत. मी दोन अडीच वर्षांपासून ठोकतोय, काय झालं? दोन वेळा गाडीवर दगड टाकले, यापलीकडे काय केलं? याच राजकारण पोलिसांवर चालतं”, अशी टीका गोपीचंद पडळकर यांनी केली.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT