उद्धव ठाकरे यांनी संत सेवालाल महाराजांचा प्रसाद नाकारला? : भाजपनं निशाणा साधत केला निषेध

मुंबई तक

मुंबई : बंजारा समाजाचे महत्त्वाचे तीर्थस्थान असलेल्या पोहरादेवी गड येथील महंत सुनील महाराज यांनी शुक्रवारी शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सुनील महाराज व बंजारा समाजाच्या प्रमुख सदस्यांनी शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश करत असल्याचे जाहीर केले. दरम्यान सुनील महाराज यांच्या प्रवेशानंतर भाजपने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला असून त्यांचा निषेध […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

मुंबई : बंजारा समाजाचे महत्त्वाचे तीर्थस्थान असलेल्या पोहरादेवी गड येथील महंत सुनील महाराज यांनी शुक्रवारी शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सुनील महाराज व बंजारा समाजाच्या प्रमुख सदस्यांनी शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश करत असल्याचे जाहीर केले. दरम्यान सुनील महाराज यांच्या प्रवेशानंतर भाजपने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला असून त्यांचा निषेध करत असल्याचेही म्हटले आहे.

काय म्हटले भाजपने?

हेच का उद्धव ठाकरे यांचे हिंदुत्ववादी विचार? आमच्या मंदिरांतील प्रसाद सुद्धा चालत नाही?बंजारा समाजाचे श्रद्धास्थान संत सेवालाल महाराज व जगदंबा मातेचा प्रसाद नाकारून अखिल भारतीय बंजारा समाजाचा अपमान करणाऱ्या उद्धव ठाकरेंचे जाहीर निषेध !!! बंजारा समाजाचे मतदान चालतं पण श्रद्धेने दिलेला प्रसाद नाही, हा बंजारा समाजाचा आणि समाजाच्या देवी देवतांचा अपमान आहे, असे भाजपने म्हटले आहे.

नेमके काय घडले?

भाजपने ट्विट केलेल्या ट्विटमध्ये दिसत असल्याप्रमाणे, महंत सुनील महाराज यांनी पक्ष प्रवेश केल्यानंतर त्यांनी उद्धव ठाकरे यांना प्रसाद खाण्यासाठी दिला. यावेळी ठाकरे यांनी प्रसाद स्वीकारुन तो न खाताच शेजारी उभ्या असलेल्या व्यक्तीच्या हातात दिला. तसेच सुनील महाराज यांनी दुसऱ्यांदा दिलेला प्रसाद नाकारल्याचेही व्हिडीओमध्ये दिसत आहे. याच मुद्द्यावरुन भाजपने ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

प्रवेश केल्यानंतर सुनील महाराज काय म्हणाले?

मी मागेच सांगितलं होतं की, नवरात्रीत मोठा निर्णय होणार. राज्यात दीड ते दोन कोटी बंजारा भाविक आहे. बंजारा मतदार आहे. त्यांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी. फक्त शिवसेनाच त्यांना न्याय देऊ शकते. महाराष्ट्रातून पुष्कळ लोकांच्या हे लक्षात आले, त्यामुळे आता शिवसेनेत प्रवेश करून उद्धव ठाकरेंसोबत खंबीर उभे राहणार आहोत.

हे वाचलं का?

    follow whatsapp