नक्षलवादी भागातील तरुणांना पोलिसांच्या मदतीने मिळणार नोकऱ्या
मुंबई तक: गडचिरोली म्हणजे नक्षल हिंसा आणि भरकटलेला युवा असा समज होतो. या जिल्ह्यातील मूळ समस्या आहे ती रोजगार नसण्याची. गडचिरोली पोलिसांनी आता या विषयावर गांभीर्याने लक्ष दिले आहे. प्रथम एनजीओच्या माध्यमातून पोलिसांनी या भागातील तरुणांना नोकरीच्या संधी देण्यासाठी उपक्रम सुरू केला आहे. गडचिरोली जिल्ह्यात 80 टक्क्यांहून अधिक भागात जंगल आहे. इथली माणसं पावसावर आधारित […]
ADVERTISEMENT

मुंबई तक: गडचिरोली म्हणजे नक्षल हिंसा आणि भरकटलेला युवा असा समज होतो. या जिल्ह्यातील मूळ समस्या आहे ती रोजगार नसण्याची. गडचिरोली पोलिसांनी आता या विषयावर गांभीर्याने लक्ष दिले आहे. प्रथम एनजीओच्या माध्यमातून पोलिसांनी या भागातील तरुणांना नोकरीच्या संधी देण्यासाठी उपक्रम सुरू केला आहे.
गडचिरोली जिल्ह्यात 80 टक्क्यांहून अधिक भागात जंगल आहे. इथली माणसं पावसावर आधारित शेती, आणि जंगलातून मिळणाऱ्या वस्तूंवर गुजराण करतात. नक्षलग्रस्त भाग असल्यामुळे रोजगाराच्या संधी फारशा नाहीतच. भरकटलेल्या तरुणांकडे मग नक्षल दलम हाच पर्याय असतो. पोलिसांनी सिव्हीक एक्शन प्रोग्रामनंतर राबविलेल्या अभियानाच्या माध्यमातून या समस्येचं मूळ ओळखल. त्यानंतर आता प्रथम फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून जिल्ह्यातील तरुणांना मदत करण्यासाठी पाऊलं उचलण्यात आली.
युवक-युवतींना वेगवेगळ्या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून कौशल्य प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी पोलिसांच्या ‘रोजगार app’ वर नोंदणी करण्यात आली. नोंदणी केलेल्या युवक-युवतींना वेगवेगळ्या अभ्यासक्रमांच्या माध्यमातून कौशल्य प्रशिक्षण देण्यात येईल. त्यांनंतर नोकरीची संधी उपलबद्ध करुन देण्यात येणार आहे. या प्रशिक्षणासाठी जिल्ह्याच्या अतिदुर्गम भागातील युवक-युवतींची निवड करण्यात आली आहे.