वडिलांना कोरोना, तर आईला कर्करोगामुळे गमावलं; कोण आहे Bulli Bai अॅपची मास्टरमाइंड श्वेता?
Bulli Bai App Case: ‘बुली बाई’ अॅप प्रकरणात मुंबई पोलिसांनी 18 वर्षीय श्वेता सिंहला उत्तराखंडमधून अटक केली आहे. यापूर्वी या प्रकरणात आणखी एक आरोपी विशाल कुमार यालाही अटक करण्यात आली होती. आतापर्यंत पोलिसांनी याप्रकरणी एकूण दोघांना अटक केली आहे. या प्रकरणात श्वेता मुख्य आरोपी असल्याचे सांगण्यात येत आहे. जाणून घेऊया श्वेता सिंहबद्दल सविस्तरपणे.. कोण आहे […]
ADVERTISEMENT

Bulli Bai App Case: ‘बुली बाई’ अॅप प्रकरणात मुंबई पोलिसांनी 18 वर्षीय श्वेता सिंहला उत्तराखंडमधून अटक केली आहे. यापूर्वी या प्रकरणात आणखी एक आरोपी विशाल कुमार यालाही अटक करण्यात आली होती. आतापर्यंत पोलिसांनी याप्रकरणी एकूण दोघांना अटक केली आहे. या प्रकरणात श्वेता मुख्य आरोपी असल्याचे सांगण्यात येत आहे. जाणून घेऊया श्वेता सिंहबद्दल सविस्तरपणे..
कोण आहे आरोपी श्वेता सिंग?
ती उत्तराखंडची रहिवासी असून ती या प्रकरणातील सूत्रधार असल्याचे सांगण्यात येत आहे. श्वेताने बुली बाई अॅपवर काही विशिष्ट समुदायातील महिलांचे फोटो अपलोड केले होते. तसेच त्यांच्याबाबत अत्यंत आक्षेपार्ह टिप्पणी देखील केली होती. धक्कादायक बाब म्हणजे हे सगळं करणाऱ्या श्वेताचे वय अवघे 18 वर्षे आहे. मुंबई पोलिसांनी तिला उत्तराखंडमधील उधमसिंह नगर जिल्ह्यातून अटक केली आहे.
श्वेताचे आई-वडील या दोघांचंही निधन झालं आहे. गेल्या वर्षी तिच्या वडिलांचं कोरोनाने निधन झालं होतं, तर त्याआधी तिची आई कर्करोगाने मृत्यू पावली होती. श्वेताला तिला एक मोठी बहीण आहे जी वाणिज्य शाखेत पदवीधर आहे. तर एक लहान बहीण आणि भाऊ देखील आहे. जे सध्या शाळेत शिकत आहेत. श्वेता स्वतः इंजिनीअरिंगच्या प्रवेश परीक्षेची तयारी करत होती.