Sharad Yadav Death: JDUचे माजी अध्यक्ष शरद यादवांचे निधन
Sharad Yadav Passed Away: गुरुग्राम: जेडीयूचे (JDU) माजी अध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री शरद यादव (Sharad Yadav) यांचे निधन (Death) झाले आहे. शरद यादव यांनी वयाच्या 75व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. बिहारच्या (Bihar) राजकारणात स्वतःची वेगळी ओळख असलेले शरद यादव यांच्या जाण्याने सर्वांनाच दुःख झाले आहे. त्यांच्या समाजवादी राजकारणामुळे ते लोकांमध्ये लोकप्रिय झाले होते. पण […]
ADVERTISEMENT
Sharad Yadav Passed Away: गुरुग्राम: जेडीयूचे (JDU) माजी अध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री शरद यादव (Sharad Yadav) यांचे निधन (Death) झाले आहे. शरद यादव यांनी वयाच्या 75व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. बिहारच्या (Bihar) राजकारणात स्वतःची वेगळी ओळख असलेले शरद यादव यांच्या जाण्याने सर्वांनाच दुःख झाले आहे. त्यांच्या समाजवादी राजकारणामुळे ते लोकांमध्ये लोकप्रिय झाले होते. पण आता या नेत्याने जगाचा निरोप घेतला आहे. (former jdu president sharad yadav passed away breathed his last at age of 75)
ADVERTISEMENT
गुरुग्राममधील फोर्टिस रुग्णालयात त्यांचे निधन झाले. आज दिवसभर छतरपूर येथील 5 वेस्टर्न (डीएलएफ) या त्यांच्या निवासस्थानी त्यांचं पार्थिव हे अंत्य दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.
शरद यादव यांची मुलगी सुभाषिनी हिने वडिलांच्या निधनाबद्दल ट्विटरवरून शोक व्यक्त केला आहे. तिने लिहिले आहे की, ‘बाबा गेले.’ फोर्टिस रुग्णालयाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शरद यादव यांना बेशुद्ध अवस्थेत रुग्णालयात आणण्यात आले होते. त्यांच्या नाडी ठोके सुरु नव्हते. त्यांना प्रोटोकॉलनुसार सीपीआर देण्यात आला. सर्व प्रयत्न करूनही त्यांचे प्राण वाचवता आले नाही. रात्री 10.19 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या कुटुंबाप्रती आमच्या संवेदना.
हे वाचलं का?
राजकीय वर्तुळात शोककळा
शरद यादव या समाजवादी नेत्याच्या जाण्याने राजकीय वर्तुळातही शोककळा पसरली आहे. शरद यादव यांच्या जाण्याने दु:ख झाल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. ‘प्रदीर्घ राजकीय कारकिर्दीत त्यांनी खासदार आणि मंत्री म्हणून वेगळी ओळख निर्माण केली होती. लोहिया यांच्या विचारांनी त्यांना खूप प्रेरणा मिळाली होती. त्याच्याशी झालेलं प्रत्येक संभाषण मला आठवेल. त्यांच्या कुटुंबीयांप्रति माझ्या संवेदना. ओम शांती.’
Pained by the passing away of Shri Sharad Yadav Ji. In his long years in public life, he distinguished himself as MP and Minister. He was greatly inspired by Dr. Lohia’s ideals. I will always cherish our interactions. Condolences to his family and admirers. Om Shanti.
— Narendra Modi (@narendramodi) January 12, 2023
महाराष्ट्रातही ‘खेला होबे’! गोवा ते बिहार… आतापर्यंत कुठे कुठे झालंय ‘ऑपरेशन लोटस’?
ADVERTISEMENT
लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनीही शोक व्यक्त केला आहे. बिर्ला म्हणाले की, ‘शरद यादव हे विलक्षण प्रतिभा असलेले महान समाजवादी नेते होते. वंचित आणि शोषितांच्या वेदना दूर करण्यासाठी त्यांनी आपले जीवन समर्पित केलेले. त्यांच्या निधनाने समाजवादी चळवळीचे मोठे नुकसान झाले आहे. कुटुंबातील सदस्यांना माझ्या संवेदना.’
ADVERTISEMENT
वरिष्ठ राजनेता, पूर्व सांसद शरद यादव जी के निधन पर शोक व्यक्त करता हूं। वे विलक्षण प्रतिभा वाले महान समाजवादी नेता थे जिन्होंने वंचितों–शोषितों के दर्द को दूर करने के लिए अपना जीवन समर्पित कर दिया। उनका निधन समाजवादी आंदोलन के लिए बड़ी क्षति है। परिजनों के प्रति मेरी संवेदनाएं।
— Om Birla (@ombirlakota) January 12, 2023
बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव म्हणाले की, ‘मंडल मसीहा, आरजेडीचे ज्येष्ठ नेते, महान समाजवादी नेते आणि माझे पालक आदरणीय शरद यादव यांच्या अकाली निधनाच्या बातमीने मी दु:खी झालो आहे. मी काहीही बोलण्यास असमर्थ आहे. आई आणि भाऊ शंतनू यांच्याशी चर्चा झाली. या दु:खाच्या प्रसंगी संपूर्ण समाजबांधव कुटुंबीयांच्या पाठीशी आहोत.’
मंडल मसीहा, राजद के वरिष्ठ नेता, महान समाजवादी नेता मेरे अभिभावक आदरणीय शरद यादव जी के असामयिक निधन की खबर से मर्माहत हूँ। कुछ कह पाने में असमर्थ हूँ।
माता जी और भाई शांतनु से वार्ता हुई। दुःख की इस घड़ी में संपूर्ण समाजवादी परिवार परिजनों के साथ है।
— Tejashwi Yadav (@yadavtejashwi) January 12, 2023
आदित्य ठाकरे वाचणार आता लालू प्रसाद यादवांचे राजकारण; बिहारमध्ये मिळाली दोन पुस्तकं भेट
याशिवाय काँग्रेस नेते राजीव शुक्ला यांनीही शोक व्यक्त केला आहे. शुक्ला म्हणाले- ‘माजी केंद्रीय मंत्री आणि जनता दल (युनायटेड)चे माजी अध्यक्ष शरद यादव यांच्या निधनाची बातमी ऐकून धक्का बसला. जनतेची नाडी समजून घेणारे ते उत्तम राजकारणी होते. त्यांच्या कुटुंबीयांना आणि अनुयायांसाठी माझ्या संवेदना. ओम शांती.’
पूर्व केंद्रीय मंत्री और जनता दल (यूनाइटेड) के पूर्व अध्यक्ष श्री शरद यादव जी के निधन के बारे में जानकर स्तब्ध और पीड़ा हुई। वह एक अच्छे राजनेता थे जो लोगों की नब्ज समझते थे। उनके परिवार और अनुयायियों के प्रति मेरी संवेदनाएं। ओम शांति।
— Rajeev Shukla (@ShuklaRajiv) January 12, 2023
शरद यादव यांचे राजकारण आणि वैयक्तिक आयुष्य
या महान नेत्याने आपल्या अनेक दशकांच्या राजकारणात खूप काही पाहिले आहे. बिहारमध्ये लालूराजचे ते प्रत्यक्षदर्शी होते, त्यांनी जेडीयू पक्षाला मजबूत केलं आणि अनेक महत्त्वाच्या राजकीय घडामोडींमध्ये सक्रिय भूमिका बजावली.
शरद यादव यांच्या वैयक्तिक आयुष्याविषयी बोलायचे झाले तर त्यांचा जन्म 1947 मध्ये मध्य प्रदेशातील होशंगाबाद येथील एका गावात झाला होता.
शरद यादव यांना अगदी लहानपणापासूनच राजकारणात रस होता आणि 1971 साली त्यांनी अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले होते. डॉ. राम मनोहर लोहिया यांच्या विचारांनी प्रेरित सक्रिय युवा नेता म्हणून, शरद यादव यांनी अनेक चळवळींमध्ये भाग घेतला होता आणि 1969-70, 1972 आणि 1975 मध्ये मिसा अंतर्गत त्यांना ताब्यात घेण्यात आले होते. शरद यादव यांनी 1974 साली सक्रिय राजकारणात प्रवेश केला होता.
मध्य प्रदेशातील जबलपूर लोकसभा मतदारसंघातून ते पहिल्यांदा खासदार म्हणून निवडून आले. तो जेपी चळवळीचा काळ होता आणि शेतकरी म्हणून जेपीने निवडलेले ते पहिले उमेदवार होता. त्यानंतर त्यांनी राजकारणात कधीही मागे वळून पाहिलं नाही. संपूर्ण देशात त्यांनी आपल्या खास राजकारणाची एक छाप सोडली.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT