एकाच म्यानात दोन तलवारी कशा राहणार? एकमेकांविरोधात लढलेले टारफे-मगर शिवसेनेत
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोडून गेलेल्या आमदारांच्या मागे लागत बसण्यापेक्षा नवीन टीम बांधणीला सुरुवात केली आहे. याच नव्या टीममध्ये आज कळमनुरीचे माजी आमदार संतोष टारफे आणि 2019 मधील उमेदवार अजित मगर सामील झाले आहेत. दोघांनीही ठाकरेंच्या उपस्थितीत शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे बांगर यांच्यासमोर मोठे आव्हान निर्माण […]
ADVERTISEMENT
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोडून गेलेल्या आमदारांच्या मागे लागत बसण्यापेक्षा नवीन टीम बांधणीला सुरुवात केली आहे. याच नव्या टीममध्ये आज कळमनुरीचे माजी आमदार संतोष टारफे आणि 2019 मधील उमेदवार अजित मगर सामील झाले आहेत. दोघांनीही ठाकरेंच्या उपस्थितीत शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे बांगर यांच्यासमोर मोठे आव्हान निर्माण होण्याची शक्यता आहे.
ADVERTISEMENT
मात्र या दोघांच्या प्रवेशाने आणखी एक प्रश्न पडतो तो म्हणजे एकाच म्यानात दोन तलवारी कशा राहणार? कारण 2019 मध्ये शिवसेनेच्या संतोष बांगर यांच्याविरोधात संतोष टारफे आणि अजित मगर यांनी निवडणूक लढवली होती. पर्यायाने टारफे आणि मगर यांनीही एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढविली होती. त्यामुळेच आता कधीकाळी एकमेकांचे प्रतिस्पर्धी राहिलेल्या दोन उमेदवारांनी एकाच पक्षात केल्याने 2024 मध्ये बांगरांच्या विरोधात शिवसेनेचे उमेदवार कोण असणार हा प्रश्न अद्याप कायम आहे.
उद्धव ठाकरेंची मोठी खेळी : संतोष बांगर यांना आस्मान दाखविण्यासाठी टारफे-मगर मैदानात
हे वाचलं का?
कोण आहेत संतोष टारफे?
संतोष टारफे हे हिंगोलीच्या राजकारणातील मोठे नाव समजले जाते. काँग्रेसचे जेष्ठ नेते शिवाजीराव मोघे यांचे ते जावई आहेत. 2009 मध्ये टारफे यांनी बहुजन समाजवादी पक्षाकडून कळमनुरी विधानसभा मतदारसंघातून नशिब आजमावले होते. त्यानंतर काँग्रेसचे दिवंगत नेते राजीव सातव यांनी टारफे यांना काँग्रेसमध्ये आणले. तसेच 2014 मध्ये विधानसभेचे तिकीट देवून निवडून देखील आणले. मात्र 2019 च्या विधानसभा निवडणुकीत टारफेंचा पराभव झाला. ते थेट तिसऱ्या स्थानावर फेकले गेले.
उद्धव ठाकरेंची टीम तयार? शिंदेंना घेरण्याचं नियोजन ठरलं…
ADVERTISEMENT
शिवाय सातव यांच्या निधनानंतर हिंगोली काँग्रेसमधील गटबाजीमुळे टारफे मागील अनेक दिवसांपासून नाराज होते. मध्यंतरी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी टारफे यांना संधी मिळेल, अशी अपेक्षा होती. परंतु तिथेही त्यांना डावल्यामुळे त्यांच्या नाराजीत आणखी भर पडली. शिवाय सातव यांच्या पत्नी आणि आमदार प्रज्ञा सातव यांच्याकडूनही डावलले जात असल्यास आरोप टारफे यांनी केला होता. प्रज्ञा सातव यांच्या अशा भूमिकेमुळे इतरही कार्यकर्ते टारफे यांच्याशी वेगळ्या पद्धतीने वागत असल्याचा दावा टारफेंनी केला होता.
ADVERTISEMENT
अजित मगरही शिवसेनेत :
संतोष टारफे यांच्या सोबत संतोष बांगर यांचे दुसरे प्रतिस्पर्धी आणि शेतकरी नेते अजित मगर यांनीही आज शिवसेनेत प्रवेश केला. अजित मगर यांनी 2019 मध्ये वंचित बहुजन आघाडीकडून निवडणूक लढविली होती. त्यावेळी त्यांनी जवळपास ६७ हजार मत घेवून बांगर यांच्यापुढे कडवे आव्हान उभे केले होते. त्यामुळे आता आगामी निवडणुकीतही अजित मगर मैदानात उतरल्यास बांगर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT